लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. सोमवारी मेडिकल चौक येथील इंडियन पेट्रोल पंप येथे आंदोलन करीत पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अच्छे दिन कहा गये, असा सवाल करण्यात आला.युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तौसिफ खान, उपाध्यक्ष धीरज पांडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव गिरीश पांडव, दक्षिण नागपूर अध्यक्ष प्रशांत धोटे यांच्या नेतृत्वात निदर्शने करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. केंद्रात मोदी सरकार येण्यापूर्वी पेट्रोल- डिझेल दरवाढीसाठी भाजपा नेते काँग्रेसला दोषी ठरवित होते. सत्तापालट झाल्यास महागाई कमी होईल, अच्छे दिन येतील, अशी स्वप्ने जनतेला दाखविली जात होती. मात्र, भाजपा सत्तेत आल्यानंतर महागाई आणखी वाढली, असे गिरीश पांडव यांनी यावेळी सांगितले.आंदोलनात भूषण मरसकोल्हे, दिनेश यादव, चक्रधर भोयर, नावेद शेख, अझहर शेख, राकेश निकोसे,मंगेश शातलवार,बादल वहाणे,वीरेंद्र यादव,अक्षय घाटोळे, स्वप्नील ढोके,मंगेश बढेल, सुशांत लोखंडे, सूरज थापा, नीलेश पाटील, रसिक राणेकर, कुणाल पुरी,अमन कन्नाके,अक्षय हेटे,विशाल भोयर, ओम कडू,शुभम गद्दमवार,स्वप्नील ढाकणे, राज खोंडे,आकाश पाटील, सूरज दगडे, पीयूष गायकवाड,राहुल ठाकरे, सूरज कार्लेवार, मनीष ढोक, अमोल जुनघरे,भाविक महाजन, बंटी भोयर,सक्षम मासुरकर,अश्विन कांबळे, प्रज्ज्वल ठाकरे, अभिषेक महाकाळकर, शुभम तल्लर,अरविंद क्षीरसागर, प्रतीक मोहोड, अतुल ढोक, राम शास्त्रकार आदींनी भाग घेतला.
युवक काँग्रेसने दिल्या पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:00 AM
युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. सोमवारी मेडिकल चौक येथील इंडियन पेट्रोल पंप येथे आंदोलन करीत पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अच्छे दिन कहा गये, असा सवाल करण्यात आला.
ठळक मुद्दे मेडिकल चौकात आंदोलन : अच्छे दिन कहा गये?