लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जाग उठे हिंदुस्थान... ही भावना युवकांच्या क्षमतेवरच व्यक्त होऊ शकते. युवा एकदा जागा झाला की तो अशक्य अशी आव्हानेही पार करतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तसंकलन अभियानात गुरुवारी असाच प्रसंग बघायला मिळाला. लोकमतच्या आवाहनाला साद देत युवक काँग्रेसच्या टीमने रक्तदानाचे तिहेरी शतक गाठले आणि युवकांना राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी जागे होण्याची प्रेरणा दिली.
अ.भा.युवक काँग्रेसचे सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांच्या पुढाकाराने गुरुवारी आग्याराम देवी चौक येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. दिवसभरात ३२५ च्यावर नागरिकांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पडले. सकाळपासूनच शिबिरस्थळी कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत होता. येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे स्वागत उत्साहात केले जात होते. त्यांच्या आरोग्याची काळजी विशेषत्वाने घेतली जात होती. शिबिराच्या आयोजनात सहदेव गोसावी, पीयूष जैसवाल, इरफान काजी, सौरभ शेळके, हेमंत कातुरे, स्वप्निल बावनकर, सागर चव्हाण, वसीम शेख, नावेद शेख, आकाश गुजर, नयन तरवतकर, दीपक चव्हाण, मुबशशिर अहमद, कुणाल खडगी, अमन लुटे, मन्सूर भाटी, मोईज शेख, अँथोनी डेनियल, जसप्रीत सिंह संधू, रोहित वाघधरे, अनिकेत बानाईत, शोएब अन्सारी, शोएब खान, वसीम शेख, इस्तियर शाह, सार्थक चिचमलकर, समीर येवले, अतुल मेश्राम, पप्पू मेंढे, अभिषेक पाटील यांनी परिश्रम घेतले.
------------
गायत्रीनगरातही पार पडले रक्तदान
युवक काँग्रेसच्या वतीने गायत्रीनगर, जगनाडे चौक येथेही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथील शिबिरातही दात्यांचा उत्साह बघताक्षणीच दिसून येत होता. या शिबिराचे समन्वयन सहदेव गोसावी, नीरज तिवारी, सागर घायडे, अविनाश चौहान, जितू मोहोड, सचिन खोब्रागडे, अंकित बानाबाकोडे, प्रवीण राणे, रोहित हाडगे, प्रशांत बरगढकर, अशोक बगमारे, राहुल जायस्वाल, मनोज बावणे, भूर्य वानखेडे, अनिकेत समर्थ, विक्रांत गोसावी, श्रीनाथ गोसावी, अर्जुन गोसावी, देव गोसावी, साईनाथ गोसावी, सिद्धांत गोसावी, राजू गोसावी यांनी केले.
................