लोकमत आॅनलाईन
वर्धा- जिल्ह्यातल्या साकुर्ली (धानोली) येथील श्याम विजयराव ठावरे (३५) या तरुण शेतकऱ्याने कर्जाचे ओझे व नापिकीला कंटाळून विषप्राशन करून आपले जीवन संपवले. श्याम ठावरे यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी कापूस व तूर पिकविली होती. मात्र तुरीला भाव न मिळाल्याने व आधीच आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांच्यासमोर बँक व खासगी कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न होता. त्यातूनच त्यांनी शुक्रवारी पहाटे चार वाजता विष घेतले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, बहीण व भाची असा मोठा परिवार आहे.