अजनी रेल्वे काॅलनीतील जवळपास सात हजारांच्या वर झाडे आहेत. ही १०० वर्षांपेक्षा जुनी झाडे इंटर माॅडेल स्टेशनसाठी ताेडण्यात येत असल्याची माहिती दु:खदायक आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही पण शहरात आधीच प्रदूषणाचा स्तर वाढत असताना एवढ्या माेठ्या प्रमाणात वृक्षताेड करण्याचे औचित्य नाही. सर्वांना नैसर्गिक ऑक्सिजन हवा आहे. नागपूरचे दिल्ली व्हायला नकाे. वृक्षताेडीचा आम्ही जाहीर निषेध करताे. आम्ही एकही झाड ताेडू देणार नाही.
- अनिकेत कुत्तरमारे