शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतिक्षा; एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप नाही 

By गणेश हुड | Published: May 29, 2024 7:17 PM

कर्जाचा हप्ता थकल्याने व्याजाचा भुर्दंड 

नागपूर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला व्हावे, असे स्पष्ट आदेश सीईओ सौम्या शर्मा यांनी दिले आहेत. परंतु  एक तारीख तर दूरच दोन-दोन महिन्याचे वेतन मिळत नाही. एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. जून महिन्याच्या एक तारखेला दोन महिन्यांचे वेतन मिळेल अशी कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे.

नागपूर जिल्हा परिषदेतील जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना मे महिन्याची २३ तारीख आली तरी एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही. काही विभागातील कर्मचाऱ्यांना तर दोन महिन्यापासून वेतन अद्याप मिळालेले नसल्याने सांगण्यात आले. वेतन दर महिन्याच्या एक तारखेला मिळत नसल्याने बँक कर्जाचा हप्ता वेळेवर भरता येत नाही. यामुळे त्यावरील व्याजाचा भूर्दंड कर्मचाऱ्यांना भरावा लागत आहे.  महिन्याच्या एक तारखेला कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी  गत काळात दिले होते. त्यानंतर काही महिने महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन मिळाले. मात्र पुन्हा वेतन दर महिन्याला मिळत नसल्याची परिस्थिती आहे.  

वास्तविक महिनाभर काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्याही सबबीवर लांबणीवर टाकता येत नाही. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना विलंब काळासाठी व्याज मागण्याचा अधिकार आहे. काही विभागाच्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचे  वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना प्रपंच चालवण्यासाठी व्याजाने कर्ज काढावे लागले. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.  हा आमच्यावर अन्याय असल्याची भावनाअनेक  कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

विभागनिहाय शेड्युल असतानाही विलंबअधिनस्त उपविभागातील कर्मचाऱ्यांच्या नियमित पगाराची देयके साहाय्यक लेखाधिकाऱ्यांमार्फत वित्त विभागाला सादर होते. तेथून कोषागार आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन वर्गप्रक्रिया सुरू होते. यासाठी प्रत्येक विभागाला तारखा ठरवून दिलेल्या आहेत. मात्र ठरलेल्या तारखांना विभागाकडून देयके सादर होत नसल्याने वेतनाला  विलंब होत असल्याची माहिती मिळाली. महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी सं संघटनेचे  राज्य अध्यक्ष संजय धोटे, जिल्हाध्यक्ष सत्येंद्र अत्रे, कार्याध्यक्ष नरेंद्र मेश्राम, उपाध्यक्ष अनिल बालपांडे, चंद्रमणी मनवर, कार्याध्यक्ष मिथीलेश देशमुख आदींनी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर