शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

जि.प. अध्यक्षांना फटाके, उपाध्यक्षांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:25 AM

मंगळवारी लागलेले ग्रामपंचायतीचे निकाल, जि.प.च्या पदाधिकाºयांच्या दृष्टिकोनातून काहीसे धक्कादायक तर काहीसे सुकर लागले आहे. स्वत: जि.प. अध्यक्षाला आपले गृहगाव असलेली ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात अपयश आले.

ठळक मुद्देसभापतींची फिप्टी-फिप्टी : माजी उपाध्यक्षांसाठी फिलगुड निकाल; जि.प. निकालाचे समीकरण बिघडणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी लागलेले ग्रामपंचायतीचे निकाल, जि.प.च्या पदाधिकाºयांच्या दृष्टिकोनातून काहीसे धक्कादायक तर काहीसे सुकर लागले आहे. स्वत: जि.प. अध्यक्षाला आपले गृहगाव असलेली ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात अपयश आले. मात्र उपाध्यक्षाने आपल्या दत्तक गावातल्या ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता मोडीत काढून ताबा मिळविला. जि.प. मधील चार सभापतींपैकी दोघांना आपल्या ग्रामपंचायती राखण्यात यश आले तर दोघे अपयशी ठरले.ग्रामपंचायतीच्या निकालावर जिल्हा परिषद व विधानसभेच्या निवडणुकीचा कौल ठरतो. जि.प.च्या सदस्यच आपल्या सर्कलमधील ग्रामपंचायतीचे उमेदवार उभे करतात. त्यांच्या प्रचारापासूनची जबाबदारी घेतात. त्यामुळे ग्रामपंचायती ताब्यात आल्यास, जि.प.च्या निवडणुकीच्या दृष्टीने चांगले संकेत असतात. न्यायालयीन प्रकरणामुळे जि.प.च्या निवडणुका काहीशा लांबणीवर पडल्या आहेत. मात्र आज ना उद्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे पदाधिकारी व एकंदरीतच जि.प. सदस्यांच्या दृष्टीने ग्रामपंचायतीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांच्या जाऊ ज्योती सावरकर ह्या सरपंच पदासाठी धानला ग्रा.पं.मधून उभ्या होत्या. त्यांना शिवसेनेचे तापेश्वर वैद्य यांच्या पत्नी वनिता वैद्य यांनी पराभूत केले. विशेष म्हणजे तापेश्वर वैद्य व अध्यक्षांचे पती टेकचंद सावरकर हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहे. अध्यक्षांनी ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. गावाच्या विकासासाठी जि.प.चा सर्वाधिक निधी वळविला होता. तरीसुद्धा शिवसेनेने या ग्रामपंचायतीत संपूर्ण पॅनेल निवडून आणले आहे. दुसरीकडे जि.प. चे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांचे दत्तक गाव असलेल्या जुनी कामठी (गाडेघाट) या गावात काँग्रेसची सत्ता मोडीत काढून नऊपैकी सहा सदस्य व सरपंच निवडून आणले.गेडाम, चव्हाण अपयशी!शिक्षण व अर्थ समिती सभापती उकेश चव्हाण यांचे मूळगाव व त्यांचा जि.प. सर्कल असलेल्या बेलोना ग्राम पंचायतीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. येथे सरपंचासह सदस्यांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवारांनी विजयश्री पटकावली. तर समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांच्या भानेगाव व चिचोली ग्रामपंचायतमध्ये त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे यांच्या मकरधोकडा ग्राम पंचायतीमध्ये त्यांना सरपंच पदाचा उमेदवारासह पाच सदस्य निवडून आणण्यात यश आले आहे. कृषी सभापती आशा गायकवाड यांना त्यांच्या सर्कलमधील मनसर ग्रामपंचायत राखण्यात यश आले.चिखले सरपंच पण पॅनल गेलेजि.प.चे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य चंद्रशेखर चिखले यांचे मूळगाव असलेल्या मेंढेपठार (बाजार) येथे गेल्या ६५ वर्षापासून चिखले गटाचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा या गटाला युवा पॅनलच्या गटाने चांगलाच हादरा दिला आहे. मात्र, सरपंच म्हणून चिखलेंच्या पत्नी दुर्गा चंद्रशेखर चिखले यांनाच गावकºयांनी आपली पसंती दर्शविली. त्यांची या निवडणुकीत गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती झाली.दोन्ही जि.प. सदस्यांचा पराभवजिल्हा परिषदेतील विद्यमान सदस्या सरिता रंगारी व कुंदा आमधरे यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले होते. जि.प. सदस्यपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता त्यांना सरपंच व्हायचे होते. काँग्रेसच्या सरिता रंगारी या कोराडी सर्कलचे तर काँग्रेसच्या कुंदा देवराव आमधरे या आजनी सर्कलचे नेतृत्त्व करतात. सरीता रंगारी या येरखेडा ग्रा. पं. मध्ये तर आमधरे या रनाळा ग्रा. पं. च्या निवडणुकीत सरपंचपदासाठी उभ्या होत्या. विशेष म्हणजे सरिता रंगारी या काँग्रेसशी बंडखोरी करीत रिंगणात उतरल्या होत्या. परंतु त्यांना काँग्रेसच्याच विद्यमान सरपंच मंगला कारेमोरे यांनी पराभूत केले. तर कुंदा आमधरे यांना भाजपाच्या सुवर्णा साबळे यांनी मात दिली. जिल्हा परिषद सर्कलमध्ये सुमारे १४ ते १५ ग्रामपंचायती असतात. एवढ्या गावांमधून जिल्हा परिषदेवर पोहचल्यानंतरही एका गावापुरत्या मर्यादित असलेल्या या निवडणुकीत दोन्ही सदस्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.तीन गावात सरपंचच नाहीनागपूर ग्रामीण तालुक्यातील खंडाळा आणि ब्राह्मणवाडा तसेच उमरेड तालुक्यातील आपतूर येथे सरपंचपदासाठी एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हता. या जागांवर निवडणूक लढण्यासाठी राखीव प्रवर्गातील एकाही उमेदवारने अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे येथील सरपंचाची पदे रिक्त राहिली आहेत.‘वडविहिरा’ गावात अनिल देशमुखांना धक्कामाजी मंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या ‘वडविहिरा’ या गावात धक्का बसला. माजी मंत्री रणजित देशमुख, व विद्यमान आ. डॉ. आशिष देशमुख गटाच्या उमेदवारांनी तेथे बाजी मारली. प्रमोद देशमुख सरपंचपदी विजयी झाले. काटोल तालुक्यात २२ आणि नरखेड तालुक्यात १४ वर राष्टÑवादी काँग्रेसने दावा केला आहे. भाजपनेही २६ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. बेलोना येथे जिल्हा परिषदेचे सभापती उकेश चव्हाण यांच्या गटाचा सफाया झाला. माजी मंत्री रमेश बंग यांच्या रायपूरमध्ये राष्टÑवादी काँग्रेस समर्थित पॅनल विजयी झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे यांच्या गटाला सावंगा (शिवा) येथे विजय मिळाला, तर बोखारा येथे काँग्रेसच्या कुंदा राऊत यांच्या गटाच्या विद्यमान सरपंच अनिता पंडित पुन्हा एकदा सरपंचपदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या येरखेडा या गावात काँग्रेस समर्थित पॅनलने १२ जागा जिंकत एकतर्फी बाजी मारली. येथे सरपंचपदी मंगला कारेमोरे विजयी झाल्या.