शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

जि.प.ला हवी मुक्तता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:03 AM

नगर परिषद, नगर पंचायत या स्वतंत्र यंत्रणा आहेत. महापालिका, जिल्हा परिषदसारखीच त्यांची कार्यपद्धती आहे.

ठळक मुद्देनगर परिषद, नगर पंचायतीचा भार नको : आरोग्य विभागाचा शासनाला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगर परिषद, नगर पंचायत या स्वतंत्र यंत्रणा आहेत. महापालिका, जिल्हा परिषदसारखीच त्यांची कार्यपद्धती आहे. असे असतानाही या दोन्ही संस्थाच्या कार्यक्षेत्रांमध्ये काही घटना घडल्यास, जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांना धावून जावे लागले. त्याचा परिणाम जि.प.च्या कामकाजावर होतो. त्यामुळे नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जबाबदारीतून जिल्हा परिषदेला मुक्त करावे, अशी मागणी जि.प.च्या आरोग्य समितीने केली आहे. यासंदर्भात लवकरच शासनाला प्रस्तावसुद्धा पाठविण्यात येणार आहे.वाडीमध्ये डेंग्यूचा उद्रेक झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. तर शेकडोंना लागण झाली होती. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ५४ अधिकारी, कर्मचारी येथे कामाला लागले होते. वाडी ही नगर परिषद झाल्याने वाडीचा जि.प. शी सबंध राहिला नाही. असे असतानाही जि.प.च्या आरोग्य विभागाने अख्खी यंत्रणा कामाला लावली. मात्र वाडी नगर परिषदेकडून कुठलेही सहकार्य मिळाले नाही, अशी खंत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी जि.प.च्या आरोग्य समितीच्या बैठकीत व्यक्त केली. यापूर्वीही नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात अशा घटना घडल्यावर, नगर परिषदेकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही, असे मतही आरोग्य अधिकाºयांनी व्यक्त केले. त्यामुळे नगर परिषद, नगरपंचायत ही यंत्रणा जिल्हा परिषदेतून वगळावी, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शासनाकडे पाठवावा, अशा सूचना जि.प.च्या आरोग्य समितीचे सभापती व उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी अधिकाºयांना दिल्या.नगर परिषद, नगर पंचायत यांना कराच्या रूपात महसूल मिळतो. त्यामुळे त्या महसुलाचा वापर करून आपली यंत्रणा सक्षम करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा परिषदेवर निर्भर राहण्याची वेळ येणार नाही. परंतु नगर परिषद, नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करून, सर्वस्वी जि.प. वर अवलंबून राहते. जिल्ह्यातील मोहपा, खापा, मोवाड, कन्हान पिपरी, मौदा या नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये जि.प.चे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर वाडी नगर परिषद व महादुला नगर पंचायतमध्ये जि.प.चे उपकेंद्र आहे. या केंद्रावरही यंत्रणा कुठलाही खर्च करीत नाही. नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील जनता याचा उपयोग करीत असल्यामुळे नगर परिषदेने स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे आहे परंतु तसे होत नाही. त्याचा भुर्दंड जि.प. ला बसतो आहे.आम्ही इमारती द्यायला तयार आहोतनगरपरिषद व नगरपंचायतीच्या अंतर्गत आमचे दवाखाने आहे. त्या दवाखान्याच्या इमारती आम्ही या संस्थेला हस्तांतरित करायला तयार आहो. आम्ही ते आरोग्य केंद्र जि.प. क्षेत्रात स्थानांतरित करू. आजच्या घडीला जि.प.च्या आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. जि.प.चा व्याप मोठा असल्याने, नगरपरिषदेला आम्ही सेवा पुरवूच शकत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी.- शरद डोणेकर, सभापती, आरोग्य समिती, जि.प.