लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जि.प. निवडणूक आरक्षण संदर्भातील प्रकरण सध्या न्यायालयात असले तरी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार नागपुरातील निवडणूक विभागातील यंत्रणा कामाला लागली आहे. त्यानुसार जि.प. निवडणुकीसाठी उमेदवारांना १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र सादर करता येईल. नामनिर्देशन प्रक्रिया संपूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात मदत केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत जि.प. निवडणुकीच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. जि.प. करिता ५८ व १३ पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेकरिता ५८ सर्वसाधारणकरिता, २५ अनुसूचित जातीकरिता, १० अनुसूचित जमातीकरिता, ७ नागरिकाचा मागास प्रवर्गकरिता १६ आरक्षित आहेत. तर ५० टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव असून, ५८ पैकी २९ महिला राखीव आहेत. १७ मे २०१९ रोजी आरक्षण काढण्याची अंतिम कार्यवाही करण्यात आली.निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १८ डिसेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येईल. उमेदवारी अर्ज हा आॅनलाईनसुद्धा भरता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात मदत केंद्र राहील. २४ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. त्याच दिवशी वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. या उमेदवारांबाबत काही आक्षेप असल्यास २७ डिसेंबरपर्यंत अपील सादर करता येईल. जिल्हा न्यायाधीश यावर ३० डिसेंबरपर्यंत निकाल देतील. त्याच दिवशी पुन्हा वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. ज्यांचे अपील आहेत, त्यांना १ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येईल. ३० डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी चिन्ह वाटप होईल. ७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा.पर्यंत मतदान होईल. ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी होईल.त्याचप्रकारे कन्हान-पिपरी या नगर पंचायतीची निवडणूक होत आहे. ९ जानेवारी २०२० रोजी मतदान तर १० जानेवारी रोजी मतमोजणी होईल. याशिवाय उमरेड, भिवापूर नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २९ डिसेंबर रोजी मतदान व ३० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक अधिकारी अविनाश कातडे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.८ हजारावर कर्मचारी नियुक्त१३ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच २२५ झोन अधिकारी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय एकूणच निवडणूक प्रक्रियेसाठी ८०४४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.१८२८ मतदान केंद्रजिल्हा परिषदेच्या ५८ जागांसाठी होणाºया मतदानासाठी १८२८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी १८२ मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ११ नोव्हेंबर २०१९ रोजी अंतिम करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एकूण १४,१९,७७० मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ६,८३,०७२ महिला मतदार तर ७,३६,६३७ पुरुष मतदारांचा समावेश आहे.३७० मेमरी चीपची आयोगाकडे मागणीया निवडणुकीत ईव्हीएम राहणार आहेत. परंतु व्हीव्हीपॅट नाहीत. मेमरी चीप रहणार आहे. निवडणूक विभागाकडे २०१२ कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत तर ४०२४ बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. २०१२ मेमरी चीपची आवश्यकता असून सध्या १६४२ मेमरी चीप उपलब्ध आहे. उर्वरित ३७० मेमरी चीपची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच २०१२ मेटल सीलची आवश्यकता असून ७८० उपलब्ध आहेत. उर्वरित १२३२ मेटल सीलची मागणी विभागीय आयुक्तांना करण्यात आली आहे. ४०२२ मार्क पेनची गरज असून ते उपलब्ध आहेत. २१५० पॉवर पॅक आवश्यक असून ते सुद्ध प्राप्त झाले आहेत. यासोबतच ३१२ जीप , २१९ बसेस, २ मिनी बसेसची आवश्यकता आहे. सध्या ६० जीप आहेत. बसेसकरिता एसटी महामंडळाकडे मागणी करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.