शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

‘बाऊन्सर्स’ची ‘झुंड’शाही : नागपुरात चित्रीकरणाच्या परिसरात होतेय तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:40 AM

महानायक अमिताभ बच्चन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपराजधानीत आल्यानंतर त्यांची एक ‘झलक’ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमुळे त्यांचा भ्रमनिरास होत आहे. विशेषत: चित्रीकरण स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात तैनात असलेल्या ‘बाऊन्सर्स’च्या वागणुकीबाबत तर अनेकांमध्ये नाराजी आहे. कुठलाही अधिकार नसताना हे ‘बाऊन्सर्स’ परिसरातील नागरिकांसोबतच येणाऱ्या चाहत्यांच्या ‘मोबाईल’चीदेखील तपासणी करत असून प्रसंगी अरेरावीचीदेखील भाषा बोलत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचाच हा प्रकार असल्याची भावना चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपोलिसांचेदेखील मौन, चाहत्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानायक अमिताभ बच्चन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपराजधानीत आल्यानंतर त्यांची एक ‘झलक’ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमुळे त्यांचा भ्रमनिरास होत आहे. विशेषत: चित्रीकरण स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात तैनात असलेल्या ‘बाऊन्सर्स’च्या वागणुकीबाबत तर अनेकांमध्ये नाराजी आहे. कुठलाही अधिकार नसताना हे ‘बाऊन्सर्स’ परिसरातील नागरिकांसोबतच येणाऱ्या चाहत्यांच्या ‘मोबाईल’चीदेखील तपासणी करत असून प्रसंगी अरेरावीचीदेखील भाषा बोलत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचाच हा प्रकार असल्याची भावना चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन सोमवारीच नागपुरात पोहोचले. मोहननगर येथील शाळेत चित्रीकरणाचा ‘सेट’ बनविण्यात आला आहे. या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘बाऊन्सर्स’ तैनात करण्यात आले आहेत. शाळेच्या मागील बाजूला जाण्यास शाळेतीलच कर्मचाऱ्यांनादेखील मज्जाव करण्यात आला आहे. मैदानाकडे जाणाऱ्या दुसऱ्या द्वारातून केवळ परिसरातील रहिवासी व विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष ‘पास’ दाखविल्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे. चित्रीकरणाचे स्थळ हे शाळेच्या मागील बाजूच्या मैदानात असून बाजूच्या वस्तीला लागून हा भाग येतो. मात्र तेथील घरांवरदेखील ‘बाऊन्सर्स’ तैनात करण्यात आले आहेत. येथे बाहेरील कुठला चाहता आला तर त्याला उंच जागी जाण्यास मनाई करण्यात येत आहे. सोबतच जर कुणी खिशातून मोबाईल जरी बाहेर काढला तर त्याला ‘बाऊन्सर्स’ थांबवत आहेत.चित्रीकरणाच्या स्थळाच्या बाहेर एखाद्या सार्वजनिक वस्तीमध्ये मोबाईल वापरण्याचा कुणालाही अधिकार आहे. मात्र ‘बाऊन्सर्स’ त्यावर निर्बंध आणत आहेत. बुधवारी अमिताभ बच्चन चित्रीकरणासाठी आलेच नाही. मात्र तरीदेखील परिसरात कडेकोट बंदोबस्त होता.नागरिकांना गच्चीवर जाण्यास मनाईआश्चर्याची बाब म्हणजे या परिसरातील अनेक घरांमध्ये चित्रीकरणाच्या अगोदर ‘बाऊन्सर्स’ने भेटी दिल्या. चित्रीकरणाच्या वेळी घरांच्या गच्चीवर जायचे नाही, अशी सूचना त्यांनी दिली. घरातील लोकांना दिवसा गच्चीवर जाण्यासदेखील मनाई करण्यात येत आहे. जर कुणी गच्चीवर गेला तर त्याच्या पाठीमागे ‘बाऊन्सर्स’ येत असून तेथे कुणीही ‘मोबाईल’ काढला तर त्याला अरेरावीची भाषेचा सामना करावा लागत आहे.पोलीसदादा तुम्हीदेखील...या परिसरात सुरुवातीच्या दोन दिवसांत पोलीसदेखील तैनात करण्यात आले होते. काही घरांच्या गच्चीवर पोलीस होते आणि चक्क प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांना पोलिसांनी तेथून जाण्यासाठी अक्षरश: धमकावले. एक छायाचित्रकार एका घराच्या गच्चीवर गेला असता पोलिसाने त्याला ‘त्वरित खाली उतर, नाहीतर मी माझ्या पद्धतीने तुला खाली उतरवतो’, या भाषेत फर्मानच सोडले. सार्वजनिक ठिकाणी अरेरावी करणाऱ्या ‘बाऊन्सर्स’ला थांबविण्याऐवजी पोलीस कर्मचारीदेखील तीच भाषा वापरत असल्याचे चित्र दुर्दैवी असल्याचे मत चक्क एका शाळकरी विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

 

टॅग्स :Shootingगोळीबारnagpurनागपूर