गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा केली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व शैक्षणिक सत्रच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करता आले नाही. आता दिवाळीनंतर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, पहिली ते आठवीच्या शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. वर्षाचे प्रथम सत्र संपले असून, द्वितीय सत्र सुरू झाले आहे. जानेवारीमध्ये शाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच गणवेश वाटपाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. वर्षअखेर गणवेश वाटप करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत निधी अर्धा मिळाला आहे, त्यामुळे पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, जेवढा निधी उपलब्ध आहे त्याचे वाटप केले जाणार आहे.
जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:15 AM