लोहा : नगरपालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगानी वेळ व दिवस याची मुदतवाढ दिली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. आज नगराध्यक्षपदासाठी ११ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग आठमध्ये नगरसेवक पदासाठी १२८ नामनिर्देशनपत्र आले आहेत. आतापर्यंत एकूण १३४ उमेदवारी दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी दिली.लोहा पालिका निवडणुकीसाठी थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यासाठी ११ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. प्रभाग एक अ- सर्वसाधारण महिला (पाच अर्ज), प्रभाग १ ब- नागरिकाचा मागास प्रवर्ग (७ अर्ज), प्रभाग २ अ- सर्वसाधारण महिला (पाच अर्ज), प्रभाग क्र. २ ब- अनुसूचित जाती (८ अर्ज), प्रभाग ३ अ- अनुसूचित जाती महिला (९ अर्ज), प्रभाग ३ ब- सर्वसाधारण (९ अर्ज), प्रभाग ४ अ- अनुसूचित जाती महिला (१० अर्ज), प्रभाग ४ ब- सर्वसाधारण (१० अर्ज), प्रभाग ५ अ- नागरिकाचा मागासप्रवर्ग महिला (४ अर्ज), ५ ब- सर्वसाधारण (८ अर्ज), प्रभाग ६ अ- नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला (६ अर्ज), प्रभाग ६ ब- सर्वसाधारण महिला (९ अर्ज), प्रभाग ६ क- सर्वसाधारण (७ अर्ज), प्रभाग ७ अ- नागरिकाचा मागासप्रवर्ग महिला (६ अर्ज), प्रभाग क्र. ७ ब- (११ अर्ज), प्रभाग क्रं. ८ अ- सर्वसाधारण महिला (४ अर्ज), प्रभाग क्रं. २ ब- नागरिकाचा मागासप्रवर्ग (१० अर्ज) अशा एकूण आठ प्रभागांत १३४ अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज स्वीकारले. शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३ तीन तर नगरसेवक पदासाठी ३४ आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बोरगावकर यांनी दिली़शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ३ अर्जआठ प्रभागात १३४ अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले़शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३ तीन तर नगरसेवक पदासाठी ३४ अर्ज आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बोरगावकर यांनी दिली़सहा़ निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर, मुख्याधिकारी डोईफोडे, नायब तहसीलदार चव्हाण हे सहकार्य करीत आहेत.
लोहा पालिकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ११ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:59 AM
आज नगराध्यक्षपदासाठी ११ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग आठमध्ये नगरसेवक पदासाठी १२८ नामनिर्देशनपत्र आले आहेत.
ठळक मुद्देनगरसेवकपदासाठी १३४ अर्ज, आज छाननी