लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेतील तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचारी तथा शिक्षकांच्या काऊंसिलींगद्वारे बदली प्रक्रियेला आज सकाळपासून जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरूवात झाली. बदली प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात वित्त विभागातील ११ कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.शासनाच्या नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेतील एकूण कर्मचा-यांपैकी १० टक्के कर्मचा-यांची प्रशासकीय व विनंती नुसार बदली करणे तथा अंतर्गत बदलीसाठी मागणी करणा-या कर्मचा-यांच्या बदली आदेश देण्यासाठी काऊसिलींगचे आयोजन करण्यात आले.यामध्ये वित्त विभागातील एकूण ११ कर्मचा-यांची बदल्यांची प्रक्रिया आज पूर्ण झाली. यामध्ये सहाय्यक लेखाधिकारी -१ प्रशासकीय बदली, तीन विनंतीनुसार तर दोन अंतर्गत, कनिष्ठ लेखाधिकारी- १, प्रशासकीय बदली, वरिष्ठ सहाय्यक- १ प्रशासकीय बदली आणि तीन विनंती नुसार बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.त्यानंतर ग्रामसेवकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला रात्री आठ वाजता सुरूवात झाली. १० वर्षापेक्षा जास्त एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास दुसºया ठिकाणी बदली करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्या नुसार आज जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने प्रशासकीय बदली प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, ग्रामसेवकांची संख्या जास्त असल्यामुळे रात्री ८.१५ वाजेपर्यंत बदली प्रक्रियेला सुरूवात झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बदली प्रक्रियेला उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती दत्तात्रय रेड्डी, सभापती माधव मिसाळे, प्रकल्प संचालक नईम कुरेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी. तुकाबळे आदींची उपस्थिती होती.सकाळी ९ पासून बदली प्रक्रियेला प्रारंभ१४ मे रोजी जि.प. तील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत बांधकाम विभाग, सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत लघु सिंचन विभाग त्यानंतर दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच दुपारी १ ते २ या कालावधीत कृषीविभाग, दुपारी २ ते ३ या वेळेत पशुसंवर्धन विभाग तसेच दुपारी ३ ते ४ या कालावधीत महिला व बालकल्याण विभाग तर दुपारी ४ वाजेपासून सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांच्या बदली प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.बदली प्रक्रियेसंदर्भात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी बदली प्रक्रियेच्या कालावधीत कर्मचा-यांची सेवा ज्येष्ठता यादी तसेच रिक्त पदांची माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून पडद्यावर दाखविणे आदी संदर्भात सूचना दिल्या आहेत. तसेच बदलीच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्र्डींग करणे यासह बदली प्रक्रियेदरम्यान वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्यावर उपाययोजना म्हणून जनरेटर किंवा इनव्हर्टरची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बदली प्रक्रियेचे इतिवृत्त तयार करणे, शासन नियुक्त व अन्य आवश्यक कागदपत्रे ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
नांदेड जिल्हा परिषद वित्त विभागातील ११ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:13 AM
जिल्हा परिषदेतील तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचारी तथा शिक्षकांच्या काऊंसिलींगद्वारे बदली प्रक्रियेला आज सकाळपासून जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरूवात झाली. बदली प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात वित्त विभागातील ११ कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेतील एकूण कर्मचा-यांपैकी १० टक्के कर्मचा-यांची प्रशासकीय व विनंती नुसार बदली करणे तथा अंतर्गत बदलीसाठी मागणी करणा-या कर्मचा-यांच्या बदली आदेश देण्यासाठी काऊसिलींगचे आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्देसात विभागांतील कर्मचा-यांच्या होणार बदल्या