नांदेड : पंढरपूर येथे २३ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रे निमित्त दक्षिण मध्य रेल्वे ने १२ विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे. या पैकी नांदेड विभागातून ८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने नांदेड विभागाने नियोजन केले आहे.
गाडी संख्या ०७५०१ / ०७५०२ आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद गाडीच्या दोन फेऱ्या होतील. त्यानुसार गाडी संख्या ०७५०१ आदिलाबाद – पंढरपूर विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सुटेल. ही गाडी किनवटला सकाळी १०.१४ वाजता, नांदेड दुपारी १.०५ वाजता, परभणी २.२७ वाजता, परळी ४.१० वाजता लातूर ७.०९ वाजता निघून पंढरपूर येथे रात्री ११.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७५०२ पंढरपूर ते आदिलाबाद हि विशेष गाडी २४ जुलै पंढरपूर येथून सकाळी ५.३० वाजता सुटेल लातूर, परळी दुपारी १.३०, परभणी -३.०५ वाजता, नांदेड येथे दुपारी ४.१० वाजता पोहोचेल आणि भोकर-५.२२, किनवट-७.२२ वाजता तर आदिलाबाद येथे रात्री ८.४० वाजता पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील.
गाडी संख्या ०७५१५/ ०७५१६ नगरसोल -पंढरपूर- नगरसोल गाडीच्या २ फेऱ्या होतील. यात गाडी संख्या ०७५१५ नगरसोल– पंढरपूर विशेष गाडी नगरसोल येथून दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुटून रोटेगाव, परसोडा, लासूर मार्गे औरंगाबाद येथे ६.५० वाजता पोहोचून ७.०५ वाजता सुटेल. जालना येथे ८.२० वाजता, परतूर, सेलू, मानवत रोड मार्गे परभणी येथून २३ जुलै रोजी मध्यरात्री १२.५० वाजता सुटेल, पुढे गंगाखेड -१.४५ , परळी- २.४५ वाजता सुटून लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी मार्गे हि गाडी पंढरपूर येथे दिनांक २३ जुलै रोजी सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७५१६ पंढरपूर-नगरसोल हि विशेष गाडी पंढरपूर येथून दिनांक २४ जुलै रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि दिनांक २५ जुलै रोजी परळी-०७.०० वाजता, परभणी-८.३०, जालना-१०.५४, औरंगाबाद येथे सकाळी ११.४० वाजता पोहोचेल आणि ११.४५ वाजता सुटून नगरसोल येथे दिनांक २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. या गाडीला एकूण १० डब्बे असतील.
गाडी संख्या ०७५२३/०७५२४ अकोला-पंढरपूर-अकोला या गाडीच्यादेखील दोन फेऱ्या होणार आहेत. गाडी संख्या ०७५२३ अकोला – पंढरपूर विशेष गाडी अकोला येथून दिनांक २२ जुलै रोजी रात्री ८.१० वाजता सुटेल. पुढे वाशीम येथे रात्री ९.२५ , हिंगोली-१०.०६ , पूर्णा-११.५५ परभणी येथे दिनांक २३ जुलै रोजी रात्री साडेबारा वाजता पोहोचेल. हि गाडी परभणी येथे नगरसोल-औरंगाबाद येथून येणाऱ्या गाडी संख्या ०७५१५ या गाडीला जोडण्यात येईल. पुढे हि गाडी ०७५१५ बनूनच पंढरपूर येथे सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी परभणीपर्यंत ०७५१६ बनून येईल आणि परभणी येथून अकोला कडे जाणारे डब्बे वेगळे करून गाडी संख्या ०७५२४ रात्री ८.१७ वाजता सुटेल आणि अकोला येथे दुपारी १.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील.
त्याचबरोबर बिदर -पंढरपूर-बिदर या मार्गावर दोन फेऱ्या होतील. यामध्ये गाडी क्रमांक ०७५१७ / ०७५१८ ही विशेष गाडी दिनांक २२ जुलै रोजी दुपारी बिदर येथून ३.४५ वाजता सुटेल आणि भालकी, कमलानगर, उदगीर, लातूर रोड ला सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. पुढे हि गाडी आदिलाबाद-पंढरपूर विशेष गाडीला लातूर रोड येथे जोडण्यात येईल आणि पुढे हि गाडी आदिलाबाद-पंढरपूर विशेष गाडी बनूनच धावेल. हि गाडी पंढरपूर येथे रात्री ११.३० वाजता पोहोचेल. तसेच या गाडीचे डब्बे पंढरपूर – आदिलाबाद विशेष गाडीला जोडून लातूर रोड पर्यंत येतील आणि लातूर रोड येथे ते वेगळे करून पुढे हि गाडी ०७५१८ लातूर रोड येथून विशेष गाडी बनून दिनांक २५ तारखेला सकाळी १०.१७ वाजता लातूर रोड येथून सुटेल आणि उदगीर, कमलानगर, भालकी मार्गे बिदर येथे दुपारी १.२० वाजता पोहोचेल.
गाडी संख्या ०७५२१/०७५२२ पंढरपूर -बिदर - पंढरपूर अशा दोन फेऱ्या होतील. गाडी संख्या ०७५२१ ही गाडी २३जुलै रोजी सकाळी ५.३० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि कुर्डूवाडी, बार्शी , उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, कमलानगर, भालकी मार्गे बिदर येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात २३ जुलै रोजी च गाडी संख्या ०७५२२ बिदर येथून सायंकाळी ४ वाजता सुटून भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूर येथे रात्री ११.३० वाजता पोहोचेल.
या गाडीला २० डब्बे असतील.गाडी संख्या ०७५१९/०७५२० पंढरपूर -बिदर - पंढरपूर ही विशेष गाडी दिनांक २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि कुर्डूवाडी, बार्शी , उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, कमलानगर, भालकी मार्गे बिदर येथे सायंकाळी ७.१५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात २४ जुलै रोजी हि गाडी संख्या ०७५२० बिदर येथून दुपारी २.३० वाजता सुटून भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूर येथे रात्री ११.१० वाजता पोहोचेल. सदर गाडीला एकूण २० डब्बे असतील, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी कळविली आहे.