लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बोधडीत २०११ च्या जनगणनेनुसार ५५१ घरकुलांना मंजुरी मिळाली, यातील १२८ पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले. अपात्र लाभार्थी पात्र आणि पात्र लाभार्थी अपात्र ठरविण्यात आले.दरम्यान, घरकुल योजनेत आमच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करीत लाभार्थ्यांनी पंचायत समिती गाठून आपल्या भावनांना वाट करुन दिली. किनवट तालुक्यात सर्वात मोठी म्हणून बोधडी ग्रामपंचायतची ओळख आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथे ५५१ घरकुलांना मंजुरी मिळाली. ग्रामपंचायतीने योग्य पाहणी न करता अपात्र असलेल्यांना पात्र आणि पात्र असलेल्यांना अपात्र ठरविल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प व्यवस्थापक यांना पत्र देवून सविस्तर चौकशी करुन कारवाई करण्याचे सूचित केले. मात्र दीड महिना उलटूनही यासंदर्भात काहीच चौकशी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला- पुरुषांनी २१ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती गाठून ५५१ घरकुलांना मंजुरी दिली कशी? आम्हाला का वगळले? पात्र असतानाही आम्हाला अपात्र का ठरविले? अपात्र लाभार्थ्यांना पात्र कसे ठरविण्यात आले? आदी प्रश्नांचा भडीमार केला. योगायोगाने नांदेड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, सहा. प्रकल्प संचालक डॉ. प्रवीण घुले किनवट दौºयावर होते. अन्यायग्रस्त लाभार्थ्यांनी त्यांचीही भेट घेवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. याप्रकरणी चौकशी करण्यात येवून वंचित लाभार्थ्यांची नावे ‘ड’ यादीत समाविष्ट करु, असे आश्वासन कुलकर्णी यांनी दिले. त्यानंतर लाभार्थी शांत झाले. दरम्यान, ‘लोकमत’शी बोलतानाही कुलकर्णी यांनी तेच सांगितले.
किनवट तालुक्यातील बोधडीतील १२८ पात्र लाभार्थ्यांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:49 AM
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बोधडीत २०११ च्या जनगणनेनुसार ५५१ घरकुलांना मंजुरी मिळाली, यातील १२८ पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले. अपात्र लाभार्थी पात्र आणि पात्र लाभार्थी अपात्र ठरविण्यात आले.
ठळक मुद्दे प्रधानमंत्री आवास योजना