बदली प्रक्रियेत जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेविका संवर्गातील ६९ बदल्या झाल्या आहेत. यात प्रशासकीय ५१ तर विनंती १८ बदल्यांचा समावेश आहे. आरोग्य सहायिका संवर्गात ६ बदल्या करण्यात आल्या. यात प्रशासकीय ५ तर एक विनंतीवरुन बदली करण्यात आली. औषध निर्माण अधिकारी पदाच्या एकूण १५ बदल्या करण्यात आल्या. यात प्रशासकीय १० तर विनंतीवरून ५ बदल्यांचा समावेश आहे.
आरोग्य सेवक संवर्गात ४७ बदल्या झाल्या. यात प्रशासकीय ४४ तर विनंतीवरून ३ बदल्या करण्यात आल्या. विनंतीवरून विस्तार अधिकारी एक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गात एक. आरोग्य सहायक पदाच्या प्रशासकीय कारणावरून दोन बदल्या करण्यात आल्या आहेत.