शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
4
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
5
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
6
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
7
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
8
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
9
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
10
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
11
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
12
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
13
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
14
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
16
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
17
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
18
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
19
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
20
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष

उन्हाळी सुट्या करिता नांदेडहून १४६ विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 3:24 PM

दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांची अपेक्षित गर्दी लक्षात घेवून  प्रवाश्यांच्या सुविधे करिता विशेष १४६ गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांची अपेक्षित गर्दी लक्षात घेवून  प्रवाश्यांच्या सुविधे करिता विशेष १४६ गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रेल्वेच्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडया खालील प्रमाणे असणार आहेत.

1) नांदेड येथून दिल्लीला जाण्या करिता 24 विशेष गाड्या :

अ)  गाडी संख्या 02485 नांदेड ते हजरत निझामुद्दीन (दर गुरुवारी)  :

ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकातून दर गुरुवारी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला खांडवा, इटारसी, भोपाल, झांसी, आग्रा, मार्गे निझामुद्दीन येथे शनिवारी रात्री 02.00 वाजता पोहोचेल.

 हि गाडी नांदेड येथून दिनांक 10, 17, 24, 31 मे, 7, 14, 21, 28 जून आणि  5, 12, 19, 26 जुलै -2018  रोजी सुटेल.

 ब) गाडी संख्या 02486 निझामुद्दीन ते नांदेड विशेष गाडी ( दर शनिवारी) :

हि गाडी निझामुद्दीन रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी सकाळी 05.50 वाजता सुटेल. आणि आग्रा, झांशी, भोपाल, इटारसी, खांडवा, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे रविवारी सकाळी 07.00 वाजता पोहोचेल.

हि गाडी निझामुद्दीन येथून दर शनिवारी दिनांक 12, 19 , 26 मे, 2,9,16, 23, 30 जून आणि  7, 14, 21, 28 जुलै -2018  रोजी सुटेल.

2) नांदेड येथून पुणे आणि पनवेल ला जाण्या करिता 26 विशेष गाड्या :  

क)   गाडी संख्या 07617 नांदेड ते पनवेल विशेष गाडी (दर शनिवारी)  :गाडी संख्या 07617  नांदेड येथून दिनांक दर शनिवारी सायंकाळी 17.30 वाजता सुटेल आणि परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद , पुणे मार्गे पनवेल येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 09.00  वाजता पोहोचेल.

ही गाडी नांदेड येथून मे महिन्यात 12, 19 आणि 26 तारखेला सुटेल. जून महिन्यात 2, 9, 16, 23 आणि 30 तारखेला सुटेल. तर जुलै महिन्यात 7, 14, 21 आणि 28 तारखेला सुटेल.या गाडीच्या 13 फेर्‍या होतील.

 ड) गाडी संख्या 07618 पनवेल ते नांदेड विशेष गाडी (दर रविवारी) :  गाडी संख्या 07618   पनवेल येथून दिनांक  दर रविवारी सकाळी 10.00 वाजता सुटेल आणि पुणे, उस्मानाबाद , लातूर, परळी, परभणी मार्गे नांदेड येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 05.00  वाजता पोहोचेल.

ही गाडी पनवेल येथून मे महिन्यात 13, 20 आणि 27 तारखेला सुटेल. जून महिन्यात 3, 10, 17, 24 तारखेला सुटेल. तर जुलै महिन्यात 1, 8, 15, 22 आणि 29 तारखेला सुटेल.

 3)   नांदेड येथून जबलपूर आणि सिकंदराबाद ला जाण्या करिता 17 विशेष गाड्या :

इ) गाडी संख्या 01704 जबलपूर ते  सिकंदराबाद विशेष गाडी (सोमवारी)  :

ही गाडी जबलपूर येथून दर सोमवारी रात्री 20.00 वाजता निघेल. अकोला वाशिम हिंगोली नांदेड मार्गे दुसऱया दीवशी 19.00 वाजता सिकंदराबाद ला पोहोचेल.

हि गाडी जबलपूर येथून दिनांक 14,21,28 मे महिन्यात आणि   4,11,18,25 जून महिन्यात  धावेल. हि गाडी जबलपूर येथून दर सोमवारी रात्री 20.00 वाजता सुटेल आणि  सिकंदराबाद येथे मंगळवारी रात्री 19.00 वाजता पोहोचेल.

ई) गाडी संख्या 01703  सिकंदराबाद ते जबलपूर (मंगळवारी)  :

परतीच्या प्रवासात हि गाडी सिकंदराबाद येथून मे महिन्यात दर मंगळवारी दिनांक 8,15,22,29  आणि जून महिन्यात दिनांक 5,12,19,26 रोजी धावेल. हि गाडी सिकंदराबाद  येथून दर मंगळवारी  रात्री 20.30 वाजता सुटेल तर जबलपूर येथे बुधवारी  सायंकाळी  17.15 वाजता पोहोचेल

4) नगरसोल ते तिरुपती विशेष आणि नांदेड ते तिरुपती विशेष  गाडीच्या 26 फेऱ्या :

उ)   गाडी संख्या 07417 तिरुपती- नगरसोल- (शुक्रवारी) विशेष गाडी :

हि गाडी तिरुपती येथून दर शुक्रवारी सकाळी 07.30 वाजता  सुटेल. हि गाडी  मे महिन्यात 11,18,25, जून महिन्यात 1,8,15,22,29 आणि जुलै महिन्यात 6,13,20 आणि 27 जुलै रोजी सुटेल.  हि गाडी औरंगाबाद, जालना, परभणी, परळी मार्गे धावेल.

ऊ)  गाडी संख्या 07418 नगरसोल-तिरुपती विशेष गाडी (शनिवारी ):हि गाडी नगरसोल येथून दर शनिवारी रात्री 22.00 वाजता सुटेल. हि गाडी मे महिन्यात 12,19,26 तारखेला,  जून महिन्यात 2,9,16,23,30  आणि  जुलै महिन्यात  7,14,21,28 तारखेला सुटेल.या गाडीस 20 डब्बे असतील.

5) गाडी संख्या  07607/07608  हु. सा. नांदेड – तिरुपती – हु. सा. नांदेड  (27 फेऱ्या) 

क) हि गाडी संख्या 07607हु.सा. नांदेड ते  तिरुपती  (मंगळवारी)  :

 ही गाडी नांदेड येथून दर मंगळवारी सायंकाळी 18:45 वाजता सुटेल.

हि गाडी नांदेड येथून  मे महिन्यात 8,15,22,29 आणि जून महिन्यात 5,12,19,26 आणि जुलै महिन्यात दिनांक 3,10,17,24,31 तारखेला  सुटेल सुटेल . हि गाडी निझामाबाद, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे धावेल.

ख)  गाडी संख्या 07608 तिरुपती ते हु.सा. नांदेड (बुधवारी) :

हि गाडी तिरुपती येथून दर बुधवारी 15:45 वाजता मे महिन्यात ,9,16,23,30 तारखेस आणि जून महिन्यात 6,13,20,27 तारखेस आणि जुलै महिन्यात 4,11, 18, 25 तारखेस सुटेल.या  गाडीस 12 डब्बे असतील.

6)    गाडी संख्या 02731 / 02732 हैदराबाद –नांदेड-जयपूर-हैदराबाद  उन्हाळी विशेष  गाडीच्या 26 फेऱ्या

ग)   गाडी संख्या 02731  हैदराबाद-जयपूर विशेष गाडी (शुक्रवारी) :

हि गाडी हैदराबाद  येथून दर शुक्रवारी  16:25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या  दिवशी जयपूर येथून 15:00 वाजता पोहोचेल. नांदेड येथून मध्य रात्री 00 .10 वाजता सुटेल.  

हि गाडी निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, भोपाल, उज्जैन, रतलाम, अजमेर, मंदार ज. मार्गे धावेल.

हि गाडी मे महिन्यात 11,18,25 तारखेला तर जून महिन्यात 1,8,15,22,29 आणि जुलै महिन्यात 6,13,20,27 तारखेला सुटेल.

घ)   गाडी संख्या 02732  जयपूर -- हैदराबाद- दर रविवारी विशेष गाडी (रविवारी) :

हि गाडी जयपूर   येथून दर रविवारी दुपारी 15.00 वाजता सुटेल आणि मंगळवारी हैदराबाद सकाळी 02.00 वाजता पोहोचेल . नांदेड येथून हि गाडी रात्री 19.50 वाजता  सुटेल.  

हि गाडी निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, भोपाल, उज्जैन, रतलाम, अजमेर, मंदार ज. मार्गे धावेल.

हि गाडी मे महिन्यात 13,20,27 तारखेला तर जून महिन्यात 3,10,17,24 आणि जुलै महिन्यात 01, 8,15,22,29  तारखेला सुटेल.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीNandedनांदेड