चौकट......
या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या कायम....
१४ एप्रिलच्या रात्रीपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला हे पाऊल उचलावे लागले. मात्र, नियमांची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने रुग्णसंख्येत मोठी घट झालेली दिसत नाही.
लॉकडाऊन कालावधीत पोलीस प्रशासनही अभावानेच रस्त्यावर आढळते. कारवाई मोहीम कडक नसल्यानेही नियमांचे पालन होताना दिसत नाही.
नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करीत आहेत. सोबत काेरोना रोखण्यासाठीच्या नियमांचेही उल्लंघन केले जात आहे.
नागरिकांनी करावे नियमांचे पालन...
शासन, प्रशासनाकडून कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रयत्नांना नागरिकांनीही साथ देण्याची गरज आहे. मात्र, कोरोनाचा विसर पडल्यासारखी स्थिती असून प्रमुख रस्त्यांवर नागरिकांचा वावर सुरूच आहे. दुसरीकडे याच कालावधीत ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे आढळले आहे.