लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील नवीन मोंढा भागातून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १८ तोळे सोने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली़ बँकेपासून हे चोरटे व्यापाºयाचा पाठलाग करीत होते़ या घटनेमुळे नवीन मोंढा परिसरात खळबळ उडाली आहे़सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत चिंतावार मूळचे भोकर येथील रहिवासी असून नांदेडातील विनायकनगर येथे राहतात़ चिंतावार यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वीच बुलढाणा अर्बन बँकेतील लॉकरमध्ये घरातील १८ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग ठेवलेली होती़ परंतु चिंतावार यांना बॅगेत केवळ चांदीची भांडे असल्याची माहिती होती़ त्यात दसरा सण दोन दिवसांवर येवून ठेपलेला असल्यामुळे चंद्रकांत चिंतावार हे पूजेसाठी भांडे आणण्यासाठी बँकेत गेले होते़ दुपारी बँकेतून त्यांनी दागिन्यांची बॅग घेतली़ यावेळी बॅग उघडून त्यांनी तपासणीही केली नाही़ त्यानंतर बँकेतून ते नवीन मोंढा भागातील भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट येथे गेले़ या ठिकाणी दागिन्यांची बॅग काऊंटरवर ठेवून त्यांनी किराणा साहित्याची खरेदी केली़ त्याच दरम्यान, दोन चोरट्यांनी ही बॅग लंपास केली़ बँकेपासून हे चोरटे चिंतावार यांचा पाठलाग करीत होते़चिंतावार हे खरेदीनंतर काऊंटरवर आले असताना त्यांनी या ठिकाणी बॅग दिसली नाही़ त्यानंतर त्यांनी याबाबत मुलाला माहिती दिली़ मुलाने त्यावेळी बॅगेत १८ तोळे सोने असल्याचे सांगताच चिंतावार यांना धक्काच बसला़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
चोरटे सीसीटीव्हीत कैददोन चोरट्यांनी चिंतावार यांचा बुलढाणा बॅकेपासून पाठलाग केला होता़ चिंतावार सुपर मार्केटमध्ये खरेदीत असताना त्यांनी अलगदपणे सोन्याचे दागिने असलेली ही बॅग लंपास केली़ तर दुसरा चोरटा हा मार्केटबाहेर दुचाकी घेवून उभा होता़ त्यानंतर दोघांनीही दुचाकीवरुन धूम ठोकली़ दरम्यान, या दोन्ही चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रण झाले आहे़