पालकमंत्री चव्हाण यांनी नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृहाची अडचण लक्षात घेऊन त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास पत्र दिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेऊन संबंधित विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागास वसतिगृहाच्या बांधकामासाठी उच्चाधिकार समितीने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने १८.८६ कोटी रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
चौकट ............................................
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी तसेच आंतररुग्ण व अपघात विभागातील सेवेसाठी महाविद्यालयाच्या परिसरात राहणे आवश्यक आहे. परंतु वसतिगृह नसल्याने वैद्यक शाखेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही अडचण पालकमंत्री चव्हाण यांनी ओळखून वसतिगृहाचा प्रस्ताव पाठविणे तसेच शासनाकडून मंजुरी मिळवून घेण्यात यश मिळविले.