कोरोना बळीमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे, पण काही बळी हे ४० वर्षांच्या रुग्णांचीही आहेत.
११ मार्च रोजी जिल्ह्यात कोरोनाचा एक बळी होता. १२ मार्च रोजी २, १३ मार्च ४, १४ मार्च २, १५ व १६ मार्च प्रत्येकी एक, १७ मार्च रोजी बळींची संख्या ६ वर पोहोचली होती. १८ मार्च ३, १९ मार्चला ५, २० मार्चला ७, २१ मार्च ९, २२ व २३ मार्च रोजी मृत्युंचा आकडा दोन अंकावर पोहोचला. प्रत्येकी १० बळी या दोन दिवसांत गेले. २४ मार्च रोजी ६, २५ मार्च रोजी ९ त्यानंतर २६ मार्च ते ३१ मार्च दरम्यान दररोज हा आकडा नवा उच्चांक गाठत गेला. २६ मार्च रोजी १७, २७ मार्च रोजी १६, २८ मार्च रोजी १८, २९ मार्च १९, ३० मार्चला २० आणि ३१ मार्चला २४ बळी कोरोनाने गेले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना नियमावलीचे पालन प्रत्येकाने करण्याची गरज आहे. लॉकडाऊनमध्येही अनेक जण भटकंती करत असल्याचे चित्र आहे. अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.