चौकट---------------
आदिवासी भागातील सर्व जागा भरणार
शाळानिहाय रिक्त जागा घोषित करण्यात येणार आहेत. त्यानंतर आदिवासी क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात येणार असून त्यानंतर जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय ठरविण्यात येणार आहे. यात रिक्त जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखविण्यात येतील. याबरोबरच अवघड क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांना बदली हवी असल्यास त्या जागाही दाखविल्या जातील.
चौकट------------
शिक्षकांच्या यादीबाबत सीईओ घेणार निर्णय
नव्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील. या याद्या प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसात शिक्षणाधिकाऱ्यांकडे दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकांना अर्ज करता येतील. या अर्जावर शिक्षणाधिकारी सात दिवसात निर्णय घेतील. त्यावर समाधान न झाल्यास चार दिवसात शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपिल करता येईल आणि या अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसात निर्णय घेतील.
चौकट----------------
नवीन सूचनामध्ये काय बदल करण्यात आले आहे?
शासनाच्या या नवीन सूचनामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यात विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा असणार आहे. रिक्त जागांची यादी जाहीर झाल्यानंतर उरलेल्या शिक्षकांना पसंती क्रमांकामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर शेवटच्या पाचव्या टप्प्यात सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात येईल.
कोट-------------
राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाची लवकरच बैठक वरिष्ठांच्या सूचनेनंतर घेण्यात येईल. बदली प्रक्रिया समजून घेऊन त्यानंतर यासाठीची कार्यवाही करण्यात येईल.
- बंडू आमदूरकर, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.