साेमवारी १०४ कोरोनाबाधितांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यात मनपाअंतर्गत ६४, विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १, देगलूर १, मुखेड १, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३, माहूर १२, किनवट ४ आणि खासगी रुग्णालयातील ४ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात १ हजार ३ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील २३ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ७१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत ६४, किनवट कोविड रुग्णालय ३५, मुखेउ ९, हदगाव ८, महसूल कोविड केअर सेंटर ३८, देगलूर ४ आणि खासगी रुग्णालयात १०० रुग्ण उपचार घेत आहेत. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी असून त्यात मनपा हद्दीत ४१८ तर तालुकांतर्गत १७२ रुग्ण उपचार घेत आहेत.