शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

जुन्या नांदेडातील गाळ्यांसाठी २३८ अर्ज; उत्पन्न वाढीसाठी मनपाचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:35 AM

जुन्या नांदेडातील महापालिकेच्या गाळे भाड्याने देण्यासाठी झालेल्या प्रक्रियेत गुरुवारी ६८ गाळ्यांसाठी २३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील २९ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

नांदेड : जुन्या नांदेडातील महापालिकेच्या गाळे भाड्याने देण्यासाठी झालेल्या प्रक्रियेत गुरुवारी ६८ गाळ्यांसाठी २३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील २९ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचवेळी २९ गाळ्यांसाठी मात्र फेरप्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे या गाळ्यांचे काम अंतिम टप्प्यात असतानाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.महापालिकेच्यावतीने शहरात तीन ठिकाणी व्यापारी गाळे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये जुन्या नांदेडातील बंजारा हॉस्टेल गाळ्यामध्ये ६८ गाळे, काबरानगर येथे २८ आणि श्रावस्तीनगर येथे १३ गाळे प्रस्तावित आहेत. या सर्व गाळ्यांचे काम सुरू आहे. काही गाळ्यांचे काम ८० टक्के तर काही गाळ्यांचे काम ५० ते ६० टक्के इतके आहे.हे गाळे ४० वर्षासाठी भाड्याने देण्यासाठी आज प्रक्रिया राबविण्यात आली. या गाळ्यांसाठी महापालिका ५ लाख, ७ लाख रुपये अनामत घेणार आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ दिवसात ५० टक्के अनामत रक्कम भरावे लागणार आहेत. त्यानंतर उर्वरीत रक्कम गाळा ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेकडे भरावी लागणार आहे. यामध्ये बंजारा हॉस्टेल गाळ्यांसाठी २३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जदाराकडून प्रत्येकी २० हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेने घेतली आहे. एका गाळ्यासाठी ३ बोलीधारक पात्र करण्यात आले आहेत. २९ गाळ्यांसाठी बोलीधारक निश्चित झाले असून ११ फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रिया होणार आहे.उर्वरीत ३९ गाळ्यांसाठी मात्र एकास तीन या प्रमाणे बोलीधारक आले नाही. तसेच अन्य काही बाबीमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या ३९ गाळ्यांसाठी फेरप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे नियंत्रण अधिकारी तथा उपायुक्त अजितपालसिंघ संधु यांनी सांगितले.दरम्यान, काबरानगर येथील २८ आणि श्रावस्तीनगर येथील १३ गाळे भाड्याने देण्यासाठी महापालिका लवकरच प्रक्रिया सुरू करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काम पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेने उभारलेले गाळे घेण्यासाठी नागरिक इच्छुक असून यातून महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. तसेच गाळ्यांचे अर्धवट कामेही पूर्ण होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका