नांदेड : नांदेड लोकसभेसाठी जिल्ह्यात २५ लाख ३ हजार ६०२ मतदार असून या मतदारांची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १२ लाख ९९ हजार पुरुष मतदार तर १२ लाख २ हजार महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियाळे यांनी दिली.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघात राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणी संदर्भात दावे व हरकती आॅनलाईन तसेच आॅफलाईन पद्धतीने मागवण्यात आले होते. या कार्यक्रमात नमुना क्रमांक ६ चे १ लाख १६ हजार ७७३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख १२ हजार ४७९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत २५ लाख ३ हजार ६०२ मतदारांची नावे समाविष्ट आहेत.या मतदार याद्या मतदान केंद्र निहाय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. मतदारांना मतदार यादीत आपले नाव आहे की नाही? हे आॅनलाईन पद्धतीनेही पाहता येणार आहे. आयोगाच्या एनव्हीएसपी या संकेत स्थळावर आपले नाव पाहता येणार आहे. त्याचवेळी मतदारांना १९५० या टोलफ्री क्रमांकावर आपल्या शंका, प्रश्न, अडचणी विचारता येणार आहेत.ज्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली नाहीत त्यांनी नव्याने अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यावर पुढील कार्यवाही होईल, असे निवडणूक विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेची तयारी वेगात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट मशिनचा वापर केला जाणार आहे. या व्हीव्हीपॅट मशिन आणि ईव्हीएम मशिनबाबत जिल्हाभरात निवडणूक विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात आली आहे. यासाठी विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. १९ वाहनाद्वारे ही जनजागृती करण्यात आली. तसेच समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळीनाही व्हीव्हीपॅट तसेच ईव्हीएम मशिन वापराबाबत माहिती देण्यात आली. या जनजागृतीसाठी स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली होती. या जनजागृती मोहिमेत जिल्हाभरात १ लाख ८८ हजार ९४२ नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील संपूर्ण गावे तसेच महापालिका, नगरपालिका हद्दीतील प्रभाग, वार्डामध्ये व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे.जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्र उपलब्ध झाले असून त्यात ३ हजार ६७० कंट्रोल युनिट तर ६ हजार ३११ बॅलेट युनिटचा समावेश आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशिनही उपलब्ध झाल्या असून त्यांची संख्या ३ हजार ६७१ इतकी आहे. ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांनाही या बाबत कळवण्यात आले होते. या मशिन आजघडीला खुपसरवाडी येथील शासकीय गोदामात बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ८ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीस जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, महापालिका आयुक्त लहुराज माळी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनाही पाचारण करण्यात आले आहे. दोन टप्प्यात ही बैठक चालणार असून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, लोकसभा मतदारसंघात वाढलेली ही लाखभर मते निवडणुकीत महत्वाची ठरणार आहेत.निवडणुकीसाठी कर्मचा-यांची माहिती मागवलीलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात बैठका अधिकारी, कर्मचा-यांच्या बैठका सुरू आहेत. निवडणुकीसाठी लागणा-या कर्मचा-यांची माहिती एकत्रित केली जात आहे. नोव्हेंबर २०१८ मध्येच कर्मचा-यांची माहिती वेगवेगळ्या विभागांना सादर करण्याचे निर्देश दिले होते. कर्मचा-यांची माहिती तालुकास्तरावर प्राप्त झाली आहे. ही माहिती आता एकत्रितरित्या जिल्हा निवडणूक विभागाकडे लवकरच प्राप्त होणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयासह अनुदानित शिक्षण संस्थामधील कर्मचा-यांचीही माहिती घेण्यात आली आहे. माहिती घेताना कार्यालयाकडून सर्व कर्मचा-यांची माहिती दिली असल्याचे प्रमाणपत्रही घेण्यात आले आहे. आवश्यकतेप्रमाणे कर्मचा-यांची नेमणूक निवडणूक कामासाठी केली जाईल असे उपजिल्हाधिकारी मोतियाळे यांनी सांगितले.बदल्यांकडे लक्षलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रमुख विभागातील अधिकाºयांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये महसूल, पोलिस तसेच इतर विभागांचा समावेश आहे. महसूल विभागातील जवळपास सात तहसीलदारांच्या बदल्या होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही उपविभागीय अधिकारीही जिल्ह्याबाहेर जातील, अशी शक्यता आहे. एकूणच महसूल व पोलिस विभागातील अधिकाºयांच्या बदल्याकडे लक्ष लागले आहे.
लोकसभेसाठी २५ लाख मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:45 AM
नांदेड लोकसभेसाठी जिल्ह्यात २५ लाख ३ हजार ६०२ मतदार असून या मतदारांची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १२ लाख ९९ हजार पुरुष मतदार तर १२ लाख २ हजार महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियाळे यांनी दिली.
ठळक मुद्देअंतिम मतदार यादी जाहीर एक लाखाने मतदारांची संख्या वाढली