लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वेतनवाढ तसेच कामगार करार नव्याने व कर्मचा-यांच्या हिताचा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ८ जूनपासून सुरू करण्यात आलेला अघोषित संप शनिवारी दुस-या दिवशीही सुरू होता. दरम्यान, संपामुळे एस.टी. महामंडळाला अंदाजे २० ते २५ लाख रूपयांचा फटका बसला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अविनाश कचरे यांनी दिली.महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचा-यांच्या वतीने वेतनवाढ तसेच कामगार करार नव्याने करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात अघोषित संप पुकारला आहे. दरम्यान, संपाबाबतचे मेसेज सोशल मीडियावर यापूर्वीच व्हायरल झाले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारपासून नांदेड जिल्ह्यात एस.टी. कर्मचा-यांच्या वतीने आंदोलनाला सुरूवात केली होती. सायंकाळपर्यंत जवळपास १०५ बसफे-या झाल्या होत्या. त्यानंतर शनिवारी नांदेड विभागातील अनेक आगारातील बसफेºया रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना बसस्थानकातच ताटकळत बसावे लागल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.जिल्ह्यात शुक्रवारी संपाचा फारसा परिणाम जाणवला नसला तरी विभागातून तब्बल १०५ फेºया रद्द झाल्यामुळे महामंडळाला अंदाजे ५ लाख २४ हजार रूपयांचे नुकसान झाले.दरम्यान, शनिवारी जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, देगलूर, कंधार, बिलोली, भोकर, किनवट, माहूर, हदगाव या आगारांतील बससेवा विस्कळीत झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणामी, बाहेरगावी जाणाºया प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.---तीन बसेसच्या काचा फोडल्याशुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नांदेड शहरातील विविध भागांत तीन एस.टी.बसेसवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये एमएच-२०-बीएल-२०४९ (मुखेड- नांदेड), एमएच-२०-बीएल-२८६५ (देगलूर- नांदेड) तर एम-१४-बीटी-२४०६ या क्रमांकांच्या बसवर रात्री १० ते १०.४५ च्या दरम्यान, दगडफेक झाली. या दगडफेकीत तिन्ही बसेसचे अंदाजे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.---सायंकाळपर्यंत५९१ फेºया रद्दशनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदेड विभागातील एकूण फेºयांपैकी ५९१ फेºया रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागासह बाहेरगावी जाणाºया प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. बसस्थानकावर आलेल्या बहुतांश प्रवाशांना एस.टी.च्या या संपाबाबतची माहिती नसल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. तर काही प्रवाशांनी काढलेल्या सवलत पासचे पैसे फुकट वाया गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, शनिवारी विभागातील ३ हजार २६० कर्मचाºयांपैकी ९४५ कर्मचारी गैरहजर होते. २७५ कर्मचाºयांची आठवडी सुटी तर २३२ कर्मचारी रजेवर असल्याचे एस.टी. महामंडळाकडून सांगण्यात आले.
संपामुळे नांदेड जिल्ह्यात एस.टी.चे २५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:54 AM
वेतनवाढ तसेच कामगार करार नव्याने व कर्मचा-यांच्या हिताचा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ८ जूनपासून सुरू करण्यात आलेला अघोषित संप शनिवारी दुस-या दिवशीही सुरू होता.
ठळक मुद्देप्रवाशांतून संताप, जिल्ह्यातील ९४५ कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती