शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्ह्यात कोरोनाचे २६ बळी, रुग्णसंख्या ९९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:17 AM

जिल्ह्यात सध्या १० हजार ३१९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामध्ये विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात २४६, जिल्हा रुग्णालय कोविड ...

जिल्ह्यात सध्या १० हजार ३१९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामध्ये विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात २४६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ८१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत ९३, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १२९, किनवट १०९, मुखेड २५४, देगलूर ४६, देगलूर कोविड हॉस्पिटल ५५, बिलोली ३५, नायगाव ७६, उमरी २४, माहूर १८, भोकर २१, हदगाव ४१, लोहा १०६, कंधार १०, महसूल कोविड केअर सेंटर १९५, हिमायतनगर ११, धर्माबाद ३४, मुदखेड ११, अर्धापूर १८, बारड ५, मांडवी २१ आणि खाजगी रुग्णालयांत ७६२ रुग्ण उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणात मनपाअंतर्गत सहा हजार ७६ तर विविध तालुक्यांतर्गत एक हजार ७८९ रुग्ण उपचार घेत आहेत.

गुरुवारी ८०६ कोरोना बाधितांना उपचारानंतर बरे झाल्यानंतर सुट्टी दिली आहे. त्यामध्ये विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७, मनपा अंतर्गत ५३९, किनवट १३, बिलोली २६, धर्माबाद १४, देगलूर ३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २७, उमरी ११, हदगाव ३३, अर्धापूर १७, नायगाव ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १५, भोकर १, कंधार ३, माहूर १४, लोहा १ आणि खाजगी रुग्णालयातील ७५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ६५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

चौकट---------------

मृत्यूंचा पुन्हा उच्चांकी आकडा

जिल्ह्यात गुरुवारी २६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात २, हदगाव, उमरी व किनवटमध्ये प्रत्येकी १ तर खाजगी रुग्णालयात ५ मृत्यू झाले आहेत. मयतामध्ये लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील ६० वर्षीय पुरुष, नांदेडमधील शिवाजीनगरातील ७० वर्षीय महिला, नायगावमधील ७० वर्षीय पुरुष, तरोडा बु. येथील ५२ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथील ७३ वर्षीय महिला, मुदखेड तालुक्यातील निवघा येथील ६५ वर्षीय पुरुष, नांदेडमधील सहयोगनगरातील ५२ वर्षीय पुरुष, इतवारातील ८६ वर्षीय पुरुष, कंधारमधील ८० वर्षीय पुरुष, भोकरमधील ६२ वर्षीय पुरुष, नांदेडमधील विठ्ठलनगरातील ६५ वर्षीय महिला, गुरुद्वारा भागातील ५८ वर्षीय पुरुष, सरस्वतीनगरातील ५० वर्षीय महिला, सांगवीनाका येथील ४० वर्षीय महिला, लोहा येथील ६२ वर्षीय पुरुष, नांदेडमधील विवेकनगर येथील ७० वर्षीय महिला, दयानंदनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, गोकुळनगर येथील ५५ वर्षीय पुरुष, हदगावमधील नागसेननगरातील ८० वर्षीय पुरुष, उमरी येथील रायपतवारनगर येथील ५१ वर्षीय महिला, किनवटमधील आंबेडकर चौकातील ७५ वर्षीय पुरुष, नांदेडमधील विजयनगर येथील ४७ वर्षीय पुरुष, माणिकनगरातील ४८ वर्षीय पुरुष, सरपंचनगरातील ७० वर्षीय पुरुष, नांदेडमधील ६५ वर्षीय महिला आणि लोहा तालुक्यातील कापसी येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ८२० बळी गेले आहेत.