गोकुळ भवरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी दुष्काळापाठोपाठ अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला होता़ या नैसर्गिक संकटानंतर प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतक-यांना अनुदान देण्यासाठी शासनाकडे २६१ कोटी ९५ लाखांची मागणी केली होती़ मात्र दोन वर्षे उलटली तरी या शेतक-यांच्या हाती छदामही पडलेला नाही़राज्य शासन शेतकरीविरोधी असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात़ शेतक-यांच्या या आरोपांना जणूकाही पुष्टी देणारीच ही बाब असल्याचे दिसून येते़ आॅक्टोबर २०१६ मध्ये किनवटसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला़ अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिका-यांनी नुकसानीची पाहणी केली़ यावरून अतिवृष्टीमुळे फळबाग, फळपिकांचे नुकसान निरंक असल्याचे दिसून आले़ मात्र जिरायत पीक असलेल्या सोयाबीन, ज्वारी, उडीद याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ यावरून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दिला़ यावर याद्या तयार करताना बाधित शेतक-यांना दोन हेक्टरपेक्षा जास्त अनुदान जाणार नाही, तसेच पीक कंपनीच्या मंजूर रकमेच्या ५० टक्के रक्कम या निकषावर अनुदान वाटपाच्या याद्या करण्यात आल्या़ या यादीनुसार जिल्ह्यातील १ हजार ५४७ गावे बाधित असल्याचे आणि या गावातील ४ लाख ९३ हजार ९३९ शेतक-यांचे नुकसान झाल्याचे पुढे आले होते़ या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने २६१ कोटी ९५ लाख ९८ हजार ६६८ रुपयांची मागणी शासनाकडे केली होती़ यात किनवट तालुक्यातील नुकसानीची रक्कम २० कोटी ८३ लाख १८ हजार ७८ रुपये एवढी होती़ मात्र सदर नुकसान भरपाई शासनाकडून अद्यापही मिळालेली नाही़दरम्यान, फेब्रुवारी २०१७ मध्येही किनवटसह जिल्ह्यातील ९ तालुक्यांचे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ याचे पंचनामेही करण्यात आले़ ९ तालुक्यातील तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्राला या गारपिटीचा फटका बसला होता़ या नुकसानीपोटीही तातडीने मदत देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे़ संकटकाळी शेतकºयांना मदत न मिळाल्यास संकट वाढू शकते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत़तालुकानिहाय अशी होती मागणीनांदेड -१३ कोटी ३४ लाख १३ हजार, मुदखेड- १९ कोटी ५३ लाख, अर्धापूर-११ कोटी ४५ लाख ३१ हजार, भोकर- ७ कोटी ४४ लाख २६ हजार, उमरी-११ कोटी ७६ लाख १ हजार, कंधार-१७ कोटी ६३ लाख ३५ हजार, लोहा-२९ कोटी ४२ लाख ४१ हजार, माहूर-१३ कोटी १ लाख ४९ हजार,किनवट-२० कोटी ८३ लाख १८ हजार, हदगाव-१५ कोटी १४ लाख १२ हजार, हिमायतनगर-८ कोटी ५७ लाख ९८ हजार, देगलूर-१९ कोटी ९६ लाख ९८ हजार, बिलोली-१८ कोटी ८ लाख ३५ हजार, धर्माबाद-११ कोटी ४२ लाख ७९ हजार, नायगाव-१३ कोटी २१ लाख १२ हजार, मुखेड-३१ कोटी ११ लाख ४३ हजार रुपये़
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीचे २६१ कोटी दोन वर्षानंतरही थकीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:51 AM
दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी दुष्काळापाठोपाठ अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला होता़ या नैसर्गिक संकटानंतर प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतक-यांना अनुदान देण्यासाठी शासनाकडे २६१ कोटी ९५ लाखांची मागणी केली होती़ मात्र दोन वर्षे उलटली तरी या शेतक-यांच्या हाती छदामही पडलेला नाही़
ठळक मुद्देनुकसानीची प्रतीक्षा : विमा योजनेत समाविष्ट नसलेल्यांना शासनाने दाखविला ठेंगा