घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या मशिनरी जवळपास ५ कोटी रुपयांच्या प्रिसॉल्टीन, पोस्टसॉल्टीन, प्लास्टिक बेल्गम आदी मशिनरी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या तेलंगणा राज्यातून टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. तुप्पा डम्पिंग ग्राऊंडवर ट्रामेल मशीन १००, १६, ४ एम.एम.च्या दाखल झाल्या आहेत, तर ४ कन्व्हेटर स्टॅन्ड दाखल झाले आहे. प्रिसॉल्टी सेक्शन, प्रिपेटरी, रिफाइंटमेंट सेक्शनच्याही काही मशिनरी दाखल होत आहेत. कन्हेर हे कचरा वाहून नेणारे यंत्र आहे. आता केवळ ३५ व ४ ट्रोमल येणे बाकी आहे व काही कन्व्हेटर हे १५ दिवसांच्या आत दाखल होणार आहेत. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे सावट आणि ज्या ठिकाणावरून तेलंगणा राज्यातून मशिनरी येणार होत्या त्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे काही प्रमाणात विलंब झाला आहे. आता हा प्रकल्प जानेवारीअखेर पूर्ण होऊन घनकचऱ्यापासून खतनिर्मिती होणार आहे.
घनकचऱ्याची विल्हेवाट लावणार
महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जानेवारीअखेर सुरू होणार आहे. दररोज शेकडो टन कचरा तुप्पा डम्पिंग ग्राऊंडवर आल्यानंतर येथे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती होणार आहे. या खताचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि दररोज शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाट लागणार असल्यामुळे घनकचऱ्याबाबतचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.