नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यात अनेकांनी आजार अंगावर काढल्याने आणि खूप दिवस खोकला, ताप राहिल्याने स्कोरचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात १० ते २० च्यामध्ये स्कोर येणारे ३ ते ५ टक्के रुग्ण होते, आजघडीला त्यात दहा पट वाढ झाली आहे. तपासणी झाल्यापैकी ३५ ते ४० टक्के रुग्णांचा स्कोर १० ते २० च्या दरम्यान येत आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील अधिक रुग्ण आहेत. दरम्यान, नांदेड शहरातील जवळपास सर्वच सीटी स्कॅन सेंटरवर शासकीय दरानेच सीटी स्कॅन केले जाते. त्यात एकदोन जण अपवाद आहेत.
नांदेड शहरात असलेल्या जवळपास सर्वच डायग्नोस्टिक सेंटरकडून शासकीय नियमांचे पालन केले जाते. शासनाने सीटी स्कॅनचे दर ठरवून दिले आहेत. त्यानुसारच आम्ही अडीच हजार रुपये घेतो. आजघडीला स्कोर जास्त येणारे रुग्ण वाढले असून ३० ते ४० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील रुग्ण आहेत. खूप दिवस अंगावर दुखणे काढल्याने हा परिणाम जाणवतो. पूर्वी दोन चार रुग्णांचा स्कोर २० पर्यंत गेल्याचे आढळून यायचे. परंतु, मागील काही दिवसांत १५ ते २० दरम्यान स्कोर येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातही आम्ही डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय एचआरटीसी करत नाही.