मंगळवारी प्रशासनाला २ हजार ४९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २९० बाधित आले.. आरटीपीसीआर तपासणीत बाधित आलेल्यांची आकडेवारी अशी- नांदेड मनपा क्षेत्र ७७, बिलोली १, कंधार ४, मुदखेड ४, यवतमाळ १, कर्नाटक २, नांदेड ग्रामीण ६, देगलूर १, किनवट ५, मुखेड १८, हिंगोली १, अर्धापूर ४, हदगाव ८, लोहा ६, उमरी ६, तेलंगणा ४,भोकर ७, हिमायतनगर ७, माहूर १, परभणी ३, आंध प्रदेश १, तर ॲंटिजन तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र २३, देगलूर ३, कंधार ३०, मुदखेड २, यवतमाळ ३, नांदेड ग्रामीण ९, धर्माबाद १, किनवट ५, मुखेड १०, परभणी १, अर्धापूर ७, हदगाव ५, लोहा २, नायगाव ३, हिंगोली १, भोकर ७, हिमायतनगर ३, माहूर ५, उमरी २, बीड येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १४८, जिल्हा रुग्णालयात ७१, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ९३, आयुर्वेदिक रुग्णालय ४२, किनवट ७२, मुखेड ४६, देगलूर १९, बिलोली ११६, हिमायतनगर ८, नायगाव ७, उमरी १५, माहूर १९, भोकर ५, हदगाव ३६, लोहा २५, कंधार ८, धर्माबाद ३६, मुदखेड ११, अर्धापूर १३, बारड २७, मांडवी ४, मालेगाव ८, भक्ती कोविड सेंटर १७, एनआरआय ३७, मनपाअंतर्गत गृहविलगीकरण १ हजार ५६१, ग्रामीण भागातील गृहविलगीकरण १ हजार २८९ आणि खासगी रुग्णालयात ९६३ जण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या ४ हजार ७०४ जणांपैकी १८१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण वाढले
जिल्ह्यात मंगळवारी १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृतांमध्ये ल्याहरी ता. हदगाव, असर्जन ता. नांदेड, चैतन्यनगर नांदेड, कौठा ता. कंधार, शेम्बोली ता. कंधार, मेंढला ता.अर्धापूर, इस्लापूर ता. किनवट, लोहा, ओंकारेश्वरनगर नांदेड, डोणगाव ता. मुखेड, सुगाव ता. नांदेड, कमलेवाडी ता. नांदेड, निवघा ता. हदगाव, शेळगाव ता. उमरी येथील रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी ५७८ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ७८ हजार ७७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.