जिल्ह्यात गुरूवारी २ हजार ६० संशयितांच्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १ हजार ७०९ अहवाल निगेटिव्ह तर २९२ अहवाल पॉझिटिव्ह आले. आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा क्षेत्रात ८९ रुग्ण आढळले. नांदेड ग्रामीण ११, भोकर १०, बिलोली ०९, देगलूर २०, धर्माबाद ६, हदगाव ११, हिमायतनगर ३, कंधार ८, लोहा ५, माहूर ३, मुदखेड ४, मुखेड ३७, उमरी ४, हिंगोली ४, परभणी ३, लातूर २, औरंगाबाद १ आणि हैदराबाद येथील १ रुग्ण बाधित आढळला.
अँटिजन तपासणीत नांदेड मनपा हद्दीत ३, नांदेड ग्रामीय १, बिलोली २६, हिमायतनगर ३, देगलूर ३, कंधार १, किनवट ४, मुखेड ५, नायगाव ८, उमरी २, हिंगोली ४ व लातूर येथील १ रुग्ण कोरोनाबाधित सापडला.
जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याने चिंता कायम आहे. गुरुवारी १५ कोरोना रुग्णांचे बळी गेले. त्यात हदगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, नांदेडमधील पीरनगर येथील ७० वर्षीय महिला, भोकर येथील ७० वर्षीय महिला, नांदेड येथील चैतन्यनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील ५९ वर्षीय महिला, वेदांतनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, बिलोली तालुक्यातील किनाळा येथील ६७ वर्षीय पुरुष, हदगाव तालुक्यातील हरडफ येथील ३२ वर्षीय महिला, कंधार तालुक्यातील चिखली येथील ७५ वर्षीय महिला, नांदेड तालुक्यातील खुरगाव येथील ५२ वर्षीय पुरुष, देगलूर तालुक्यातील पिंपळगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, नांदेड मधील ८० वर्षीय महिला, बिलोलीतील गांधीनगर येथील ७० वर्षीय पुरुष, देगलूर येथील देगाव रोड येथील २५ वर्षीय युवक आणि नांदेडमधील गोपालकृष्णनगर येथील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. १५ बळींमध्ये सर्वाधिक आठ बळी हे जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २, देगलूर कोविड रुग्णालयात १ आणि ४ बळी हे खासगी रुग्णालयात गेले आहेत.
गुरुवारी जिल्ह्यात ६९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामध्ये मनपाअंतर्गत ३८०, विष्णूपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २४, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय १७, खासगी रुग्णालय ११० आणि जिल्ह्यातील विविध तालुका कोविड केअर सेंटरमधील रुग्णांचा समावेश आहे.