शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

वीजबिलाचा बोजा उतरला;नांदेड परिमंडळातील ३ हजार ६३९ शेतकरी संपूर्ण थकबाकी मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 1:42 PM

नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषीपंपाची थकबाकी ४२०२ कोटींच्या घरात होती.

नांदेड : कृषीपंपाची वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलाच्या थकबाकीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ४९ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ५० टक्के माफीची मुदत संपणार असून, एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. दरम्यान नांदेड परिमंडळातील ३ हजार ६३९ शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकी भरली.

नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषीपंपाची थकबाकी ४२०२ कोटींच्या घरात होती. दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून १७१२ कोटी ७७ लाख माफ झाले. तर सुधारित थकबाकीतही ५० टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना ५० टक्के हिश्श्यापोटी १२४८ कोटी ५५ लाख अधिक सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल ६५३ कोटी ६२ लाख असे मिळून १९०२ कोटी १७ लाख रूपये भरायचे आहेत. या देय रकमेपोटी आतापर्यंत ९४ कोटी ६९ लाखांचा भरणा वर्षभरात झाला. वसुलीचे हे प्रमाण केवळ ४.९८ टक्के इतकेच आहे. नांदेड परिमंडळातील केवळ ३ हजार ६३९ शेतकऱ्यांनीच कृषीधोरणाचा फायदा घेत १०० टक्के थकबाकीमुक्त झालेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे.योजनेसाठी पात्र असलेल्या ३ लाख ५ हजार ४५३ शेतकऱ्यांपैकी १ लाख ३३ हजार ९६९ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे.

यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ५६ हजार ४१४ शेतकऱ्यांनी सहभागी होत ४५ कोटी ०२ लाख रुपयांचा भरणा केला. परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९० शेतकऱ्यांनी सहभागी होत २५ कोटी १७ लाख तसेच हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ४६५ शेतकऱ्यांनी २४ कोटी ४९ लाख रुपयांचा भरणा केला आहे. वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामांत वापरली जात असल्याने पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज समस्यांतून मुक्तता होत आहे. वसुलीमुळे उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून नांदेड परिमंडळात आतापर्यंत १ हजार ६३९ कृषीपंप वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे.

टॅग्स :electricityवीजNandedनांदेड