लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : शहराअंतर्गत रस्ते,नाली, विज आदी मुलभूत कामाना प्राधान्य देत सूंदरता व स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचा संकल्प करुन भुयारी गटार योजनेसह विविध विकासाचा समावेश असलेला ३० कोटीच्या अर्थसंकल्पाचा प्रस्ताव पालिकेने तयार करुन प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवला आहे.नगर परिषद सभागृहात २७ रोजी नगराध्यक्षा संगीता चिंचाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेस उपनगराध्यक्षा जरीनाबेगम युसूफ, सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी हरिकल्याण येलगटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सन २०१८ -१९ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात येवून सर्वसंमतीने प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला. प्रस्तावित अर्थसंकल्पात शहरातील रस्ते, नाली,विद्युत या प्राथमिक सोई सुविधांचा समावेश आहे.याबरोबरच पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागंणदारी मुक्त दर्जा टिकविण्यावर भर देण्यात येणार आहे. जुना विश्रामग्रह येथे व्यापारी संकुल बांधकाम व लिलाव, कै कुसुमताई चव्हाण व्यापारी संकुलाचा लिलाव करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजने अंतर्गत भुयारी गटार योजना राबविणे, जल साक्षरता निर्मितीसाठी प्रयत्न, प्रती व्यक्ती ७० ते १३९ लिटर पाणी पुरवठा, पावसाचे पाणी साठविण्यासाठी बांधकाम परवानगीसाठी अनिवार्य करणार, आठवडी बाजारासाठी जागा संपादित करणे, सार्वजनिक उद्यानासाठी विशेष नियोजन, अपंग कल्याणासाठी शासननिर्णयानुसार विविध योजना राबविणे महिला व बाल विकास योजना राबविणे महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार विशेष कार्यक्रम राबवणे, खेळाडुना प्रोत्साहनासाठी योजना. अर्थसंकल्पात सवार्ना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून वंचीत घटकाला प्रवाहात आणून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.दत्तगडावरील तलावाचे सुशोभीकरण४नाविण्यपूर्ण म्हणजे आठवडी बाजारासाठी जागा भूसंपादीत करण्यात येवून विकसित करण्यात येणार आहे. दत्तगडावरील तलावाचे सुशोभीकरण करुन तलावात श्री गणेश विसर्जन व स्वच्छ पाण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था होणार आहे. सार्वजनिक उद्यानासाठी विशेष नियोजन व अमलबजावणी होणार आहे. तसेच भुयारी गटार योजना राबविण्यात येणार आहे. सर्वसमावेशक शहराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पास सन्माननीय पदाधिकाºयांनी सहकार्य केल्याबद्दल मुख्याधिकारी हरिकल्याण येलगटे यांनी आभार मानले.४नगर परिषद स्थापनेपासून समृद्ध व गौरवशाली परंपरा असलेल्या पालकसंस्थेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य. गेल्या दोन वर्षात सततची अवर्षणपरिस्थिती, निर्माण झालेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे नगरवासियांवर आर्थिक भार न टाकता उपलब्ध स्त्रोतातून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाद्वारे केला - संगीता चिंचाळकर, नगराध्यक्षा
भोकर पालिकेचा ३० कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 12:33 AM