चौकट- ३८ जणांनी केली कोरोनावर मात
बुधवारी जिल्ह्यात ३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ९, एनआरआय व गृहविलगीकरण१०, भोकर २, हदगांव १, जिल्हा रुग्णालय ५, मुखेड २, देगलूर ३ आणि खाजगी रुग्णालयातील ६ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १९ हजार ३४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.