लोकमत न्यूज नेटवर्कमुदखेड : येथील नई आबादी परिसरात एका लग्नसोहळ्यात बिर्याणी खाल्ल्याने ३०० जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील १६ रूग्णांना अतिदक्षता म्हणून नांदेड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शहरातील नई आबादी परिसरात एका विवाह सोहळ्यात वºहाडी मंडळींनी बिर्याणी खाल्ली. त्यानंतर सायंकाळपर्यंत अनेकांना त्रास सुरू झाला. एक-एक स्थानिक शासकीय रूग्णालयात दाखल होवू लागले. या रूग्णांची संख्या ३०० वर गेली.त्यातील १६ गंभीर रूग्णांना नांदेडला उपचारासाठी पाठविण्यात आले. स्थानिक रूग्णालयात एवढ्या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे रूग्णांचा त्रास अधिकच वाढला.रूग्णालयाचे अधीक्षक मनातकर हे चार दिवसांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले. शहरातील खासगी रूग्णालय व लष्कराच्या सीआरपीएफ रूग्णालयात डॉक्टर सेवेसाठी उपलब्ध होते.सात रुग्णवाहका बोलावल्यामुदखेड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी एकाचवेळी रूग्ण दाखल झाल्याने एकच तारांबळ उडाली. दरम्यान, परिसरातून सात रूग्णवाहिकांना बोलविण्यात आले. तसेच केंद्रीय पोलीस कॉलेजच्या वाहनांची रुग्ण घेवून जाण्यासाठी मदत मिळाली.मुदखेड शहरातील नवी आबादी भागातील एका लग्नसमारंभात ‘मिठा’ व्यंजन खाल्ल्याने शेकडो जणांना विषबाधा झाली. दरम्यान, अनेकांना जुलाब, उलट्या होण्यास सुरूवात झाली होती.
मुदखेड शहरात बिर्याणीतून ३०० जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 1:03 AM