बिलोली (नांदेड ) : मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणा-या 31 ट्रकवर नांदेड पोलीस विभागाच्या विशेष पथकाने पहाटे कारवाई केली. बिलोली येथील सीमावर्ती भागात झालेल्या या कारवाईत ९३ ट्रक चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्याच्या सीमावर्ती भाग असलेल्या बिलोलीत मांजरा नदीपात्रातून काही दिवसांपासून नियमित अवैध वाळू वाहतूक होते. आज पहाटे 4 च्या दरम्यान यावर नांदेड येथील विशेष पोलीस पथकाने नदी पात्रात धडक कारवाई करत 31 ट्रक ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी 93 ट्रक चालक - मालकांविरोधात वाळू चोरीचा गुन्ह दाखल केला आहे. तसेच यातून वाळू व ट्रक असा मिळून 5 कोटीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई करण्यात आली. यात दंगल नियंत्रण पथकाचाही सहभाग होता.