मुख्य रस्त्यावर असलेल्या श्री हनुमान ज्वेलर्समध्ये दुपारी बाराच्या सुमारास गिऱ्हाईक म्हणून तीन व्यक्ती गाडीवरून आले होते. त्यातील दोन व्यक्तींनी देवीसाठी मंगळसूत्र पाहिजे असे सांगितले व दुकानदारांनी त्यांना चार तोळ्याचे मंगळसूत्र दाखवले. त्यातील एकाने गावात जाऊन हे दाखवून आणतो असे सांगितले व त्यांच्या सोबत असलेल्या एक व्यक्तीला दुकानात त्यांनी बसवले. दोघेजण गाडीवर बसून मंगळसूत्र दाखवण्यासाठी गावात गेले. दुकानदारांनी त्या बसलेल्या व्यक्तीला दहा-पंधरा मिनिटांनंतर विचारले तुमची सोबतची माणसे अजून का आली नाहीत? त्या व्यक्तीने मी त्यांना ओळखत नाही? असे सांगितले. व थोड्या वेळाने तोह निसटून जाण्याच्या मार्गावर असतानाच दुकानदारांनी त्याला पकडून ठेवले. परंतु त्या दोन व्यक्तीबद्दल तो काहीच माहीत नाहीत? असे वारंवार सांगत होता. या घटनेची चर्चा गावात होताच गावकऱ्यांनी दुकानासमोर गर्दी केली होती. दुपारी २ पर्यंत या घटनेची चा गुन्हा नोंदवला गेला नव्हता.
मुगट येथे भरदिवसा ४ तोळे सोन्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:33 AM