लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : तालुक्यातील हाडोळी येथे वर्ल्ड व्हिजन या सेवाभावी संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केलेला खाऊ (चिवडा) खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली.तालुक्यात ३५ ग्रामपंचायत अंतर्गत विविध कार्य करणाऱ्या वर्ल्ड व्हिजन या सेवाभावी संस्थेच्या वतीने तालुक्यातील हाडोळी येथे सकाळी ९ ते १० दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी मानसिक काळजी आणि समर्थन (सायकॉलॉजी ब्रेन केअर) कार्यक्रम घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना चिवडा व बिस्कीट वाटप केले. शाळेतील ७० हून अधिक विद्यार्थ्यांना वाटप केलेला चिवडा खाल्ल्यानंतर दुपारी ४ नंतर मुलांच्या पोटात दुखून उलट्या व मळमळ होण्यास सुरुवात झाली. पालकांनी घाबरून भोकर येथील ग्रामीण रुग्णालय गाठले.हनुमंत जाधव, माधव पतंगे, पुष्पा डुमलवाड, श्वेताबाई सिंगणीकर, गजानन पाटील, श्रेया पाटील, माधवी मिरासे, ऋती चितेपमोड, श्रुतीका कोलरे यांच्यासह ४० बालके रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. यात २ ते १३ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. मार्तंड आयनीले यांच्यासह शहरातील अन्य डॉक्टरांनी मुलांवर उपचार करीत आहेत. घटनेचे वृत्त कळताच उपसभापती सूर्यकांत बिल्लेवाड, शंकर पाटील हाडोळीकर यांनी दवाखान्यात धाव घेतली. आणखी बाधित मुलांची संख्या वाढतच आहे.नेमकी किती मुलांना विषबाधा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ग्रामीण रुग्णालयात पालक, नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. हाडोळी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्ग असून हाडोळी, कामणगाव येथील मुले शिक्षण घेतात. वर्ल्ड व्हिजनने शहरातील एका हॉटेलमधून चिवडा विकत घेतल्याचे समजते.
हाडोळीत चिवडा खाल्ल्याने ४० बालकांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:31 AM
लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : तालुक्यातील हाडोळी येथे वर्ल्ड व्हिजन या सेवाभावी संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केलेला खाऊ (चिवडा) खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली.तालुक्यात ३५ ग्रामपंचायत अंतर्गत विविध कार्य करणाऱ्या वर्ल्ड व्हिजन या सेवाभावी संस्थेच्या वतीने तालुक्यातील हाडोळी येथे सकाळी ९ ते १० दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी मानसिक काळजी आणि समर्थन ...
ठळक मुद्देवर्ल्ड व्हिजनने : बालकांना वाटप केला होता चिवडा