शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

४ तास चार्जिंगवर सायकलचा ४० किमीचा प्रवास; पानटपरी चालकाच्या वैज्ञानिक आविष्काराचे होतेय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 1:12 PM

दिवसेंदिवस होत असलेले प्रदूषण व वाढत्या पेट्रोलच्या किमतीवर पर्याय काढत, अर्धापूर शहरात पानठेला चालविणाऱ्या शिवहार घोडेकर या तरुणाने विजेवर चालणारी अनोखी सायकल बनविली आहे.

ठळक मुद्देपानठेला चालविणाऱ्या सुशिक्षित तरुणाने केला वैज्ञानिक कलेचा आविष्कारपेट्रोल-डिझेल महागाईत बनविली इलेक्ट्रिक चार्जवरील प्रदूषणमुक्त सायकल

- गोविंद टेकाळे

अर्धापूर ( नांदेड ) : अर्धापूर शहरांमध्ये पानठेला चालवत, पान सुपारी, पान विक्री करत शिक्षण पूर्ण केले. रेल्वे, महावितरण या ठिकाणी कंत्राटी पदावर नोकरी केली. गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे बेरोजगार असलेल्या तरुणाने दुकानावर व शेतीकडे ये-जा करण्यासाठी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त सायकल तयार केली असून, त्याच्या या कलेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

दिवसेंदिवस होत असलेले प्रदूषण व वाढत्या पेट्रोलच्या किमतीवर पर्याय काढत, अर्धापूर शहरात पानठेला चालविणाऱ्या शिवहार घोडेकर या तरुणाने विजेवर चालणारी अनोखी सायकल बनविली आहे. फक्त १४ हजार रुपयांमध्ये ४ तास चार्जिंगवर ३५ ते ४० किमीचे अंतर पार करता येते. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. त्यावर पर्यायी मार्ग काढत, अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौक परिसरामध्ये राहात असलेल्या शिवहार प्रकाश घोडेकर या ३२ वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषणमुक्त अशी सायकल तयार केली आहे. फक्त पाच रुपये खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल चाळीस किलोमीटरचे अंतर सायकलने पार करता येते.

अर्धापूर शहरांमध्ये पान ठेल्याचे दुकान चालवत शिक्षण पूर्ण केले, आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत, वायरमनचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर, त्यांनी रेल्वे डिव्हिजनमध्ये तीन वर्षे व महावितरणमध्ये तीन वर्षे कंत्राटी पदावर काम केले. गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही काम नसल्याने ते पानठेला चालवायचे. लॉकडाऊनमुळे सर्व अस्थापना बंद असल्याने, त्यांनी चार्जिंगवरील सायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प केला व विजेवर चालणारी सायकल तयार करत आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांच्या या वैज्ञानिक कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

बघण्यासाठी नागरिकांची गर्दीपेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने अनेकांनी बघितली आहेत. मात्र, चार्जिंगवर बनविलेली सायकल पहिल्यांदाच बघण्यात येत असल्याने, नागरिकांना कुतूहल वाटत असून, ही सायकल बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

५ रुपयांत ४० किमी पार१४ हजार रुपये खर्च आला असून, मोटार २४ होल्ट ३५० वॅट, बॅटरी २४ होल्ट ३५० वॅट, चार्जिंग किट, लाइट, गीअर एक्सलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक आदींसह वेल्डिंगचा वापर करत, ही सायकल बनविण्यात आली आहे. पाच रुपये चार्जिंगवर ४० किमी अंतर पार करता येते.

चार्जिंग फ्रीमध्ये होण्याची व्यवस्था करणारचार्जिंगवरील सायकल बनवली असून, पुढील काळात सायकल चालविताच चार्जिंग व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे.- शिवहार घोडेकर, अर्धापूर

टॅग्स :NandedनांदेडCyclingसायकलिंगenvironmentपर्यावरण