नांदेड : गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री केला जातो़ अशा विक्रेत्यांवर धाडी टाकून अन्न व औषध प्रशासनाने ४० लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता़ प्रशासनाच्या परवानगीनंतर तब्बल ४० लाख २० हजार रुपयांचा गुटखासाठा गुरुवारी जाळून नष्ट करण्यात आला.राज्यात गुटखा उत्पादन, वाहतूक व विक्रीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाची आहे़ बंदी असतानाही छुप्या पद्धतीने गुटखा विक्री केला जातो. अचानकपणे धाडसत्र राबविणे, विशेष तपासणी मोहिम राबवून गुटखाविक्री करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. जप्त केलेल्या गुटखासाठ्याचा पंचनामा करुन तो पंचासमक्ष नष्ट करण्यात येतो. काही वेळा तांत्रिक कारण व कायदेशिर अडचण निर्माण झाल्यास जप्त केलेला गुटखा लागलीच नष्ट करता येत नाही. अशा कारवाईत जप्त केलेला माल नांदेड येथील एफडीए कार्यालयात जमा करण्यात आला होता.गत वर्षभरापासून जप्त केलेल्या गुटख्यांच्या गोण्यामुळे कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसायलाही जागा उरली नव्हती. सहायक आयुक्त टी.सी. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे, नमुना सहायक राठोड यांनी २८ मार्च रोजी असदवन भागात २४ धाडीत जप्त केलेला विविध कंपन्यांचा गुटखासाठा जाळून नष्ट केला. या मालाची किंमत ४० लाख २० हजार ४३२ रुपये असल्याची माहिती कावळे यांनी दिली.दरम्यान, शहर व जिल्ह्यात शेजारील राज्यातून दररोज मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी तंबाखूची आयात करण्यात येते़ दररोज या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करण्यात येत असल्याचे दिसून येते़
४० लाखांचा गुटखा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:44 AM
गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री केला जातो़ अशा विक्रेत्यांवर धाडी टाकून अन्न व औषध प्रशासनाने ४० लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता़
ठळक मुद्देएफडीएची कारवाई : २४ धाडीत जप्त केला होता गुटखा