मागील भाजप सरकारच्या काळात निधीअभावी विकास कामे ठप्प झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी मुदखेड शहर व तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणला. शहरातील वाढती लोकसंख्या यातून भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी बळेगाव बंधाऱ्यातील पाणी मुदखेड शहराला उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा मुदखेड शहरवासीयांची होती. चव्हाण यांनीही पाणीपुरवठ्याचा प्रश्नही मार्गी लागावा यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मुदखेड शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी निधी मंजूर झाल्याने बळेगाव बंधाऱ्यातून मुदखेड शहरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. नांदेड - मुदखेड शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. यास यश मिळाले असून, शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत मुदखेड नगर परिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ४० कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या प्रकल्पाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.