पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून नांदेडात ईबीसी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या शासकीय बी.एड्. कॉलेजच्या इमारतीसाठीही साडेचौका कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कांही दिवसांपूर्वीच विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सिंग कॉलेज मंजूर झाले आहे. त्यानंतर आता श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या नवीन व स्वतंत्र इमारतीच्या बांधकामांसाठी ४४ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयास ऑटोनॉमसचा दर्जा आहे. हा दर्जा अधिक उंचावावा यासाठीच नवीन इमारतीसाठीचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून नवीन इमारतीमध्ये तळमजला व त्यावर तीन मजल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. हे बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर या संस्थेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी ४४ कोटी ७१ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:18 AM