जिल्ह्यात दररोज सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झाल्याच्या दररोज पोलीस ठाण्यात नाेंदी घेतल्या जातात. अशा मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिले होते. त्यानंतर पोनि.द्वारकादास चिखलीकर यांनी पथकाला त्याबाबत सूचना केल्या. सायबर सेलच्या माध्यमातून पोलिसांनी वजिराबाद हद्दीतील १८, शिवाजीनगरचे ८, भाग्यनगरचे ९ , विमानतळ ५, इतवारा ३, नांदेड ग्रामीण ६ व कंधार, देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण ८ लाख रुपये किमतीच्या ५१ मोबाईलचा शोध घेतला. हे मोबाईल परत मिळविण्यासाठी न्यायालयात जाण्याची आवश्यकता नसून, संबंधित पोलीस ठाण्यातूनच ते देण्यात येणार आहेत. या पथकात सपोउपनि गोविंद मुंडे, पोहेकॉ. शेख चाँद, गंगाधर कदम, सखाराम नवघरे, संजय केंद्रे, दशरथ जांभळीकर, विश्वनाथ इंगळे, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, बजरंग बोडके, गणेश धुमाळ, विलास कदम, राजू सिटीकर यांचा समावेश होता.
गहाळ झालेले ५१ मोबाईल मिळणार ठाण्यातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:21 AM