जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी हदगाव येथील ६७ वर्षीय रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ४४१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ११ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५ रुग्णांवर उपचार सुरू असून, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ५६, किनवट कोविड रुग्णालयात २२, हदगावमध्ये ५, देगलूरमध्ये ५, तर खासगी रुग्णालयात ४१ रुग्ण उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणात मनपा क्षेत्रात सर्वाधिक २२५, तर तालुकास्तरावर ६२ रुग्ण आहेत.
जिल्ह्यात बुधवारी ३० कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. त्यामध्ये विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १०, मनपांतर्गत विलगीकरणातील १३ आणि खासगी रुग्णालयातील ७ रुग्णांचा समावेश आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात ९४.६५ टक्क्यांवर आले आहे.