लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महावितरणच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात राबवलेल्या थकीत वीजबील वसुली मोहिमेत ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाख रूपये भरणा केला आहे़ तर थकीत वीजबिलापोटी जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे़मागील अनेक वर्षांपासून असलेली थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने महावितरणच्या वतीने राज्यात ‘शून्य थकबाकी मोहीम’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नांदेड मंडळाच्या वतीने माहे फेब्रुवारीमध्ये जोरदार वसुली मोहीम राबविण्यात आली. १२ पथकांच्या माध्यमांतून विविध विभागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाखांचा भरणा केला आहे.नांदेड जिल्ह्यातील दोन हजार ५५७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लघुदाब आणि उच्चदाब ग्राहक असलेल्या पाणीपुरवठा योजनांकडे १५१ कोटी ४४ लाखांची थकबाकी आहे. थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासंदर्भात वारंवार सूचना देवूनही चालू देयक तसेच थकबाकीची रक्कम न भरणाºया पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई हाती घेतली़ ५ फेब्रूवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आजपर्यंत भोकर विभागातील २१७ योजनांचा ४ कोटी ७ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच देगलूर विभागातील ६८ योजनांचा १ कोटी ७१ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी, नांदेड शहर विभागातील ९१ योजनांचा १ कोटी ७२ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी आणि नांदेड ग्रामीण विभागातील १६२ योजनांचा ५ कोटी ७७ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर उच्चदाब ग्राहक असलेल्या २२ योजनांचा ४५ कोटी १३ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३५१ पाणीपुरवठा योजनांनी थकबाकी वसुलीस प्रतिसाद देत २ कोटी ८ लाख रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये भोकर विभागाच्या ६७ योजनांचा ३ लाख, देगलूर विभागाच्या ६१ योजनांचा ४ लाख, नांदेड ग्रामीण विभागातील २०२ योजनांनी १२ लाख तसेच उच्चदाब ग्राहक असलेल्या २० ग्राहकांनी १ कोटी ८९ लाख रूपयांचा भरणा केला आहे.मार्च अखेर पर्यंत थकबाकी वसुली मोहिम अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशाराही महावितरणने दिला आहे़
५६० पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 12:24 AM
महावितरणच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात राबवलेल्या थकीत वीजबील वसुली मोहिमेत ३५१ स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकीत वीजबिलापोटी २ कोटी ८ लाख रूपये भरणा केला आहे़ तर थकीत वीजबिलापोटी जिल्ह्यातील तब्बल ५६० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे़
ठळक मुद्देथकीत वीजबील : ३५१ ग्राहकांकडून २ कोटी ८ लाखांचा भरणा