लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात फेब्रुवारीमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती पीक व फळबागेचे नुकसान झालेल्या १८ गावांतील ८३६ शेतक-यांना २७ लाख ५७ हजार ९१० रूपयांचे अनुदान मंजूर झाले़ बारूळ गावशिवारातील ८८़०८ हेक्टर पिके बाधित झाली़ अशा ११६ शेतक-यांना तालुक्यातील सर्वाधिक ६ लाख ५९ हजार १०९ रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे़ या आठवड्यात शेतक-यांना अनुदान वितरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाईत अडकला आहे़ मागील वर्षीचा खरीप हंगाम अत्यल्प पावसाने हातचा गेला़ तरीही अनेक शेतकºयांनी रबी पिकाची लागवड केली़ रबी, फळपीक, बागायती पिकावर शेतकºयांनी लक्ष केंद्रित केले़ परंतु निसर्गाचा लहरीपणा पुन्हा आडवा आहे़ फेब्रुवारी महिन्यातील दुसºया आठवड्यात गारपीट, अवकाळी पावसाने पिकावर संक्रांत आणली़ महसूल, कृषी, पंचायत आदी यंत्रणेने तातडीने नुकसानीचे पंचनामे केले़ शेतकरी संख्या व बाधित क्षेत्राची आकडेवारी संकलित करून अहवाल प्रशासनाला सादर केला़ प्रशासनाने सर्व माहिती वरिष्ठ पातळीवर पाठवून दिली़ राज्य शासनाने शेती नुकसानीची दखल घेऊन अनुदान मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़तालुक्यात सर्वाधिक अनुदान बारूळ गावातील ११६ शेतकºयांना ६ लाख ५९ हजार १०९ रूपये आहे़ काटकळंबा - १८४ शेतकºयांना ५ लाख १९ हजार १७५, गऊळ -१४२ शेतकºयांसाठी ३ लाख ५३ हजार ४५६, पानशेवडी-८३ शेतकºयांना २ लाख ६४ हजार ६६५, रुई- ६७ शेतकºयांसाठी १ लाख ६६ हजार ८३५, नागलगाव- २३ शेतकºयांसाठी १ लाख २० हजार १४५ आणि कल्हाळी येथील १४७ शेतकºयांसाठी २ लाख ५२ हजार ४० रुपये अनुदान उपलब्ध झाले़ रबी पिकासाठी हेक्टरी ६ हजार ८००, बागायती पिकासाठी हेक्टरी १३ हजार ५०० आणि फळबागेसाठी हेक्टरी १८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले़ अनुदान वितरण केल्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे़ तहसीलदार अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम जोशी प्रयत्न करीत आहेत़ जिल्हा बँकेला अनुदान रकमेचा धनादेश दिला जाणार आहे़ या आठवड्यात शेतकºयांना अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे़१८ गावे : ८३६ शेतकºयांचे नुकसानगारपीट-अवकाळी पावसाने १८ गावातील ८३६ शेतकºयांचे ३१९़८५ हेक्टर वरील पीक, फळबाग, बागायतीचे नुकसान झाले़ शासनाकडून यासाठी २७ लाख ५७ हजार ९१० रूपये अनुदान उपलब्ध झाले़ त्यात पोखर्णी- ३ शेतकºयांसाठी ५ हजार ४००, दैठणा- १ (२,७०० रूपये), घागरदरा- २१ (५२ हजार १२० रूपये), सोमठाणा- १ (५४०० रूपये ), आंबुलगा -१३ (१ लाख १५ हजार २००), वरवंट- १ (८१६० रूपये), माजरे वरवंट- ३ (८१६० रूपये), चौकीपाया - २५ (१ लाख ३५ हजार ३२० रूपये), तळ्याची वाडी - २ (५० हजार ६२५ रूपये), पेठवडज - २ (३६ हजार), सावरगाव- २ (३४०० रूपये) मंजूर झाले़
कंधार तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ५७ लाख ५० हजार मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:46 AM