पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश जे.आर. पठाण हे, तर सदस्य म्हणून प्राचार्य वि.मा. शिंदे व ॲड. पंकज गावंडे यांनी काम पाहिले. लोकअदालतीमध्ये भारतीय स्टेट बँक, किनवट व सारखणी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बोधडी, किनवट, उमरी(बा.) व इस्लापूर, विद्युत वितरण कंपनी व महेंद्रा फायनान्स, किनवट यांची प्रकरणे होती. यावेळी न्यायाधीश जे.एन. जाधव, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती यांच्यासह सरकारी वकील अशोक पोटे, अनंत वैद्य, शंकर राठोड, डी.जी. काळे, अरविंद चव्हाण, यशवंत गजभारे, यू.बी. चव्हाण, टी.आर. चव्हाण, बिपीन पवार, गजानन पाटील, सुनील सिरपुरे, सुनील येरेकार, दिलीप कोट्टावार, के.एम. राठोड, मिलिंद सर्पे (हे सर्व वकील), सुभाष दोनकलवार आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी एस.एम. चिटमलवार, एल.वाय. मिसलवार, ए.एस. धोटे, एस.व्ही. चटलेवार, बी.ए. घुले, आर.एस. माने, शेख मगदुम व एस.डी. चव्हाण यांनी परिश्रम घेतले.