१० लक्ष लोकसंख्येच्या मागे ५६० कोरोना चाचणी होणे अपेक्षित असताना तसे होत नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून पंचायत समिती, आरोग्य विभाग बँका, तहसील, कृषी, पोलीस, आगार, आयसीडीएस, महावितरण आदी कार्यालयांतील अधिकारी- कर्मचारी यांची तसेच फळ व भाजीपाला विक्रेते, कापड व किराणा दुकानदारांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आगारातील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यात १ जण पॉझिटिव्ह आढळला. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांची चाचणी घेण्यात आली. ३० डिसेंबर रोजी महावितरणमधील अधिकारी- कर्मचारी अशा ३४ जणांची चाचणी घेण्यात आली. त्यात ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एकमेकांच्या सोबत राहून काम केलेले काही जण बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. सारी, आयएलआय व संशयित क्षयरुग्णांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्याचे सुद्धा निर्देश आहेत. त्यामुळे विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी घेऊन सर्वांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु चाचणीला सकारात्मक प्रतिसाद देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कंधारात महावितरणचे ६ कर्मचारी कोरोनाबाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:13 AM