लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पोलीस कर्मचा-यांच्या कौटुंबिक अडचणी, आजार आदी जाणून घेवून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी शुक्रवारी जवळपास ७० पोलीस कर्मचा-यांना ठाणे बदलून दिले़ अपेक्षेप्रमाणे बदली मिळाल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान दिसून येत आहे़काही महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये बहुतांश पोलीस कर्मचारी नाराज होते़ दरम्यान, नूतन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सर्वच पोलीस कर्मचा-यांना पुन्हा बदलीसाठी अर्ज देण्याचे सांगितले होते. त्या अर्जावर विचार करून शुक्रवारी जिल्ह्यातील जवळपास ७० पोलीस कर्मचा-यांना बदलीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे़काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या त्यावेळेस बदल्यांचा मेळावा भरवून पोलीस अधीक्षकांनी काही जणांना त्यांच्या पसंतीची ठिकाणे दिली. काही जणांना दुसºयांदा एकाच जागी नियुक्ती मिळाली तर काही कर्मचाºयांना मागितलेल्या ठिकाणी न मिळता देगलूर किंवा किनवट अशी विचारणा केल्या गेली. त्यामध्ये आजारी असलेल्या तसेच कौटुंबिक अडचणी असणाºया कर्मचाºयांना देखील ८० ते १०० किलोमीटर दूरच्या पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली होती़ त्यात बहुतांश कर्मचारी तोंडी आदेशाने बदल्यावर गेले होते़दरम्यान, यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बदल्यामध्ये काही कर्मचाºयांना बदलीचे आदेश दिले होते़ परंतु, बहुतांश कर्मचाºयांना शुक्रवारी आपली बदली झाल्याची माहिती मिळाली़ सर्वसाधारण बदल्यामध्ये अपेक्षेप्रमाणे तसेच अडचणीचे ठाणे मिळाल्यानंतर काही कर्मचाºयांनी कर्तव्याचे ठिकाण बदलून देण्यासाठी विनंती केली होती़कर्मचाºयांना विनंतीनुसार तसेच कुटुंबाजवळ राहून नोकरी करता यावी या उद्देशाने बदल्या करण्यात आल्या़ या बदल्यांमुळे कर्मचाºयांच्या चेहºयावर समाधान झळकत होते़समाधान : कौटुंंबिक अडचणीचा झाला विचारबदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक जाधव यांनी आपल्या कक्षात बोलावून घेतले़ यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, सर्व पोलीस उपअधीक्षक, गृहपोलीस उपअधीक्षक आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, पोलीस अधीक्षक जाधव यांनी प्रत्येकाला वैयक्तिक विचारून कर्मचाºयांच्या विनंतीनुसार नियुक्ती दिली़ यात बायपास सर्जरी झालेल्या एका कर्मचाºयास देगलूरहून नांदेडात नियुक्ती देण्यात आली़ प्रत्येक कर्मचाºयास त्याचे कुटुंबीय कुठे राहते, मुलांचे शिक्षण आदी विचारणा करून सोयीचे ठाणे दिले़
नांदेडमध्ये ७० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 1:10 AM
पोलीस कर्मचा-यांच्या कौटुंबिक अडचणी, आजार आदी जाणून घेवून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी शुक्रवारी जवळपास ७० पोलीस कर्मचा-यांना ठाणे बदलून दिले़ अपेक्षेप्रमाणे बदली मिळाल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान दिसून येत आहे़
ठळक मुद्देपोलीस अधीक्षक यांच्या दालनात समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया