नांदेड : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून आज दुसºया दिवशी तीन विभागांतील ७८ कर्मचाºयांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या़जि़ प़ च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली़ शनिवारी सकाळी पहिल्या टप्प्यात महिला व बालकल्याण विभागातील तीन पर्यवेक्षिकांच्या बदल्या करण्यात आल्या़ त्यानंतर बांधकाम दक्षिण व उत्तर विभागातील दहा कनिष्ठ अभियंता, एक स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील दोन कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता, पशुसंवर्धन विभागातील दोन सहायक पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या़पहिल्या दिवशी पाच विभागांतील एकूण २२ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या़ तर २ जून रोजी सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक प्रशासकीय १३ व आपसी ६, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आपसी ३, कनिष्ठ सहायक प्रशासकीय १३ व आपसी ६, अर्थ विभाग- सहायक लेखाधिकारी १ प्रशासकीय, कनिष्ठ लेखाधिकारी प्रशासकीय ३, वरिष्ठ सहायक लेखा ३, कनिष्ठ सहायक लेखा १, शिक्षण विभाग- विस्तार अधिकारी शिक्षण प्रशासकीय ४ व आपसी १, केंद्र प्रमुख १२, माध्यमिक शिक्षक मराठी आपसी २१ व प्रशासकीय ११ अशा एकूण ५७ प्रशासकीय व २१ आपसी बदल्या करण्यात आल्या़यावेळी सभापती माधवराव मिसाळे गुरूजी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, राजेंद्र तुबाकले आदी उपस्थित होते़शिपायांच्या बदल्या करण्याचे दिले आश्वासनजिल्हा परिषदेतील शिपायांना उरला वाली न कोणी ही बदल्यांच्या संदर्भात ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जि़ प़ कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेवून वर्ग ४ च्या बदल्यासंदर्भात चर्चा केली़ यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी शिपायांच्या बदल्याही लवकरच करणार असल्याचे आश्वासन दिले़ दरम्यान, विनंती बदल्या न करण्याचे कोणतेही शासन आदेश नसतानाही जि़प़प्रशासनाने या बदल्या रद्द केल्या आहेत़
जि.प.च्या ७८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:37 AM
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून आज दुसºया दिवशी तीन विभागांतील ७८ कर्मचाºयांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या़
ठळक मुद्देबदल्यांचा दुसरा दिवस शिक्षण विभागातील ४९ केल्या बदल्या